शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

प्रेमातूनच 'त्या' तरुणावर भर रस्त्यावर जीवघेणा हल्ला; दोन्ही आरोपींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 4:01 PM

चाकूने वार करून केले गंभीर जखमी

नागपूर : यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वनदेवी चौकाजवळ दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याच्या प्रकरणाचे गूढ उलगडले आहे. एकतर्फी प्रेमातूनच संबंधित तरुणावर हल्ला करण्यात आल्याची बाब स्पष्ट झाली असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

गुरुवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास डेकोरेशनचे काम करणारा मोहम्मद साहील ऊर्फ अफजल (२४, वनदेवीनगर) याच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर यामागे प्रेमाचा अँगल असल्याची बाब समोर आली. मो. साहिलला उत्तर प्रदेशमधील आझमगड येथे राहणाऱ्या त्याच्या नातेवाइकाच्या मुलीशी लग्न करायचे होते. त्यामुळे त्याने तिला नागपूरला आणले होते. मो. साहिल व त्याचा भाऊ हेदेखील मूळचे उत्तर प्रदेशमधील गाजीपूर येथील आहेत. साहिलला गुरुवारी दुपारी शोएब अन्सारी ऊर्फ सफर अन्सारी (२३, वनदेवीनगर झोपडपट्टी) व सय्यद इर्शाद ऊर्फ गुड्डू इजाज (२३, वनदेवीनगर, झोपडपट्टी) या दोघांचा फोन आला होता. त्यांनी साहिलला फोन करून संतोषनगर चौकाजवळ बोलविले होते.

आझमगड येथून आणलेल्या मुलीवर माझे प्रेम असून आमच्या दोघात तू येऊ नको, अशी धमकी शोएबने दिली. त्यानंतर दोन्ही आरोपींनी साहिलच्या पोटावर, हातावर व पायावर चाकूने वार केले. वार इतके जोरात होते की, साहिलच्या पोटातील आतडे बाहेर आले. त्याला लोकांनी मेयो इस्पितळात दाखल केले. सुरुवातीला त्याने आरोपी कोण आहेत, हे माहीत नसल्याचे सांगितले. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेतला असता संशयावरून शोएब व सय्यदला ताब्यात घेतले. दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. साहिलचा भाऊ मो. अफसर ऊर्फ मो. शकील याच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

एकाच दिवसात प्रेम कसे ?

संबंधित मुलगी ८ मार्च रोजी आझमगडहून नागपुरात आली. २४ तासांच्या आतच साहिलवर हल्ला झाला. एका दिवसात शोएबला मुलीवर प्रेम कसे काय झाले की अगोदरपासूनच तो मुलीला ओळखत होता, हा प्रश्न उपस्थित होत असून पोलिस त्या दिशेनेदेखील चौकशी करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर