लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उच्च न्यायालयाने नागपूर जिल्ह्यातील रेतीघाटांच्या लिलाव प्रक्रियेला स्थगिती दिल्याने जिल्ह्यात भंडारा जिल्ह्यातून रोज विना रॉयल्टी नागपूर जिल्ह्यात आणली जाते. विना रॉयल्टी व ओव्हीरलोड रेतीच्या ट्रक व टिप्परवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकातील नायब तहसीलदारावर एका टिप्परचालकाने टिप्पर चालविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी समयसूचकता बाळगत उडी मारून स्वत:चा बचाव केला. दुसरीकडे तहसीलदार टिप्परला लटकले. त्यांनी टिप्परला लटकून १५ कि.मी.चा प्रवास केला. त्यानंतर वेग मंदावताच उडी मारून स्वत:चा बचाव केला. ही घटना नागपूर - गडचिरोली मार्गावरील उमरेड नजीकच्या रेल्वे क्रॉसिंगजवळ मंगळवारी (दि. ३०) सकाळी घडली.या मार्गावरील रेतीचोरीला आळा घालण्यासाठी उमरेडचे तहसीलदार प्रमोद कदम, नायब तहसीलदार योगेश शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी उमरेड - भिवापूर मार्गावरील रेल्वे क्रॉॅसिंगजवळ रेतीच्या वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली. त्यांनी एका टिप्परला थांबण्यासाठी हाताने इशारा केला. मात्र, चालकाने टिप्पर नायब तहसीलदार योगेश शिंदे त्यांच्या अंगावर नेण्याचा प्रयत्न केला. शिंदे यांनी लगेच बाजूला उडी मारत स्वत:चा बचाव केला.टिप्परचा वेग मंदावल्याने तहसीलदार कदम हे टिप्परच्या फूट रेस्ट वर पाय ठेऊन वर लटकले. त्यातच चालकाने वेग वाढविला. त्यामुळे त्यांना उतरणे किंवा उडी घेणे शक्य नव्हते. त्यांनी टिप्परला लटकून १५ कि.मी. प्रवास केला आणि उटी (ता. भिवापूर) शिवारात टिप्परचा वेग कमी होताच उडी मारली. सुदैवाने त्यांना दुखापत झाली नाही. या घटनेच्या निषेधार्थ दुपारी १२ नंतर महसूल विभागाच्या उमरेड कार्यालयातील कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. या प्रकरणी उमरेड पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.कार मागावरतहसीलदार कदम यांचा टिप्परला लटकलेल्या अवस्थेत जीवघेणा प्रवास सुरू असताना त्या टिप्परच्या मागे एमएच-४०/बीजे-०४२४ क्रमांकाची कार होती. ती कार टिप्परला १५ ते २० फूट अंतर राखून येत होती. शिवाय, कारचालक टिप्परचालकाशी मोबाईलवर संवादही साधत होता. या प्रवासात कारचालकाचे त्या टिप्परला ओव्हरटेक करण्याचाही प्रयत्न केला नाही. त्यामुळे कारचालक हा टिप्परचा मालक, रेतीमाफिया किंवा रेतीमाफियाचा हस्त असल्याची दाट शक्यता आहे.
नागपूर जिल्ह्यात रेतीमाफियांचा तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 5:26 PM
नागपूर जिल्ह्यात विना रॉयल्टी व ओव्हीरलोड रेतीच्या ट्रक व टिप्परवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकातील नायब तहसीलदारावर एका टिप्परचालकाने टिप्पर चालविण्याचा प्रयत्न केला.
ठळक मुद्देटिप्पर अंगावर नेलाउडी मारून केला बचाव