शहरं
Join us  
Trending Stories
1
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
2
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
3
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
4
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
5
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
6
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
8
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
9
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
10
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
11
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
12
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
13
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
14
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
15
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
16
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
17
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
18
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
19
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल

जीवघेणी लिफ्ट : सस्पेन्स संपला! ऑटोमॅटिक रेस्क्यू डिव्हाईस खरा व्हिलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 12:05 AM

गेल्या आठवड्यात वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर जिल्हा न्यायालयातील एक लिफ्ट बंद पडली होती व त्यात ११ व्यक्ती अडकले होते. ती लिफ्ट त्यांच्या जीवावरच उठली होती. बॅटरी बॅकअप नसल्यामुळे लिफ्टचे दार उघडले नाही असे आतापर्यंत बोलले जात होते, परंतु तो अंदाज खोटा ठरला आहे. या घटनेमागे कोण हा सस्पेन्स संपला असून ऑटोमॅटिक रेस्क्यू डिव्हाईस हा खरा व्हिलन होता, हे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देजिल्हा न्यायालयात ११ व्यक्ती थोडक्यात बचावले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या आठवड्यात वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर जिल्हा न्यायालयातील एक लिफ्ट बंद पडली होती व त्यात ११ व्यक्ती अडकले होते. ती लिफ्ट त्यांच्या जीवावरच उठली होती. बॅटरी बॅकअप नसल्यामुळे लिफ्टचे दार उघडले नाही असे आतापर्यंत बोलले जात होते, परंतु तो अंदाज खोटा ठरला आहे. या घटनेमागे कोण हा सस्पेन्स संपला असून ऑटोमॅटिक रेस्क्यू डिव्हाईस हा खरा व्हिलन होता, हे स्पष्ट झाले आहे.घटनेनंतर प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र लिहून संबंधित लिफ्टची बॅटरी खराब झाली असून ती बदलविण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार, विभागाच्या सेक्शन इंजिनियरने बॅटरीची तपासणी केली असता तिच्यात काहीच बिघाड आढळून आला नाही. ती बॅटरी गेल्या मार्चमध्येच बसविण्यात आली होती. त्यानंतर अन्य तांत्रिक उपकरणे तपासून पाहिली असता लिफ्टमधील ऑटोमॅटिक रेस्क्यू डिव्हाईस योग्य पद्धतीने कार्य करीत नसल्याचे आढळून आले. थायसेनक्रप कंपनीकडे संबंधित लिफ्टच्या देखभालीचे कंत्राट आहे. त्यामुळे कंपनीला नोटीस बजावून यावर स्पष्टीकरण मागण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती पुढे आली आहे.११ जून रोजी दुपारी ३ च्या सुमारास ही घटना घडली होती. जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारापुढील एक लिफ्ट पाचव्या माळ्यावर पोहचताच वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे लिफ्टचे दार उघडले नाही. परिणामी, ११ व्यक्ती आत अडकले. असह्य उकाडा व ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे सर्वांचा थरकाप उडाला. शरीरातून घामाच्या धारा वाहायला लागल्या. त्यातच शाहीन शहा, आफरीन अझमत व सुधा सहारे या तीन महिला वकील एकापाठोपाठ एक बेशुद्ध पडून खाली कोसळल्या. त्यामुळे सोबतच्या व्यक्तींनी आरडाओरड सुरू केली. परिसरात धावपळ उडाली. दरम्यान, तंत्रज्ञांनी १० मिनिटानंतर लिफ्टचे दार उघडण्यात यश मिळवले. तेव्हापर्यंत बेशुद्ध पडलेल्या महिला वकिलांची प्रकृती अत्यंत खराब झाली होती. योग्य वेळी उपचार मिळाल्यामुळे त्या बचावल्या होत्या.

टॅग्स :Courtन्यायालयAccidentअपघातnagpurनागपूर