नागपूर : नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर वाहने चालविताना जरा सांभाळातून. कापसी बायपासवरून महामार्गावर आल्यानंतर लीहगाव पासून २ किलोमीटर अंतरावर असलेल्या काच कंपनीजवळ जीवघेणे खड्डे पडलेले आहे. या महामार्गावरून जाणारी वाहने अतिशय वेगाने जात असतात.
खड्ड्याचा आकार आणि खोली जास्त असल्याने वाहने पलटल्याशिवाय राहणार नाही, अशी स्थिती आहे. रस्त्याच्या मधोमध हे खड्डे असून, याच भागात १० ते १२ असे मोठे खड्डे पडलेले आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी भरल्यास चालकांचे दूर्लक्ष झाल्याने मोठी घटना घडल्याशिवाय राहणार नाही. या खड्ड्यांच्या संदर्भात स्थानिक रहिवाशी प्रकाश सोनटक्के यांनी सांगितले की अशा खड्ड्यांमुळे एखाद्याचा जीव गेल्यास कोण जबाबदारी घेणार आहे. या रस्त्यावर दररोज लाखो रुपयांची टोल वसूली होत आहे. तरीही रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये दूर्लक्ष आहे.