लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : तालुक्यातील देवळी (कला) वगळता अन्य २४ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि. १५) मतदान घेण्यात आले. विविध प्रवर्गातील २९ २९ उमेदवारांची अविराेध निवड करण्यात आल्याने उर्वरित १७९ उमेदवारांचे राजकीय भाग्य सायंकाळी मशीनबंद करण्यात आले. सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात करण्यात आली असून, दुपारी १.३० वाजेपर्यंत ५४.६० टक्के तर दुपारी ३.३० वाजेपर्यंत ७३.४४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ही संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
यावेळी तालुक्यातील तारणा, चापेगडी, साळवा, किन्ही, कुजबा, भटरा, मुसळगाव, राजोला, बोरी (नाईक), म्हसली, हरदोली (नाईक), खोकर्ला, परसोडी (राजा), बानोर, वीरखंडी, वेळगाव, पारडी, वडेगाव (काळे), चितापूर, डोडमा, ससेगाव, कऱ्हांडला, हरदोली (राजा) व राजोली या ग्रामपंचायतींची निवडणूक घेण्यात आली. या सर्व गावांमधील एकूण मतदारसंख्या ७२,१२६ असून, यात ३७,८३२ पुरुष व ३४,२९४ महिला मतदारांचा समावेश आहे.
या सर्व गावांमध्ये मतदानासाठी एकूण ६९ मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली हाेती. प्रत्येक मतदान केंद्रांवर काेराेना उपाययाेजनांची करण्यात आलेली सुविधा केवळ नावालाच हाेती. फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला हाेता तर अनेक मतदान मास्कविनाच हाेते. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी म्हणून कुहीचे ठाणेदार चंद्रकांत मदने व वेलतूरचे ठाणेदार आनंद कविराज यांनी प्रत्येक मतदान केंद्रावर पाेलीसा बंदाेबस्त तैनात केला हाेता.
...
देवळी (कला) येथील निवडणूक रद्द
मतदार याद्यांमध्ये माेठ्या प्रमाणात घाेळ झाल्याचे निदर्शनास येताच कुही तालुक्यातील देवळी (कला) ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक रद्द करण्यात आली. राजाेला येथे दाेन गटांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याने वादसदृश परिस्थिती निर्माण झाली हाेती. परंतु, पाेलिसांनी वाद वेळीच मिटवला. उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या ओल्या पार्ट्या १५ दिवसांपासून झडत हाेत्या. या निवडणुकीत ‘मटण खा आणि बटण दाबा’ हा फाॅर्म्युला राबविण्यात आला.