शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

वर्षाआधी वडील गेले, आईने जाता जाता अवयवदान केले

By सुमेध वाघमार | Published: April 12, 2024 6:19 PM

नागपूर : वर्षाभरापूर्वी वडिल गेले. शेतमजुरी करून आई कसेतरी घर चालवित होती. परंतु नियतीला कदाचित हे सुख मान्य नव्हते. ...

नागपूर : वर्षाभरापूर्वी वडिल गेले. शेतमजुरी करून आई कसेतरी घर चालवित होती. परंतु नियतीला कदाचित हे सुख मान्य नव्हते. कळम यवतमाळ येथून घरी परत येत असताना रस्त्याच्या ब्रेकरवरून गाडीचा तोल गेला आणि त्या खाली पडल्या. डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा ‘ब्रेन डेड’ झाला. त्या दु:खातही त्यांच्या आई-वडिलांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. दोघांना नवे आयुष्य मिळाले. परंतु, तीन आणि पाच वर्षाची मुले पोरकी झाली.

मनीषा कोकांडे (३०) त्या आईचे नाव. यवतमाळ जिल्ह्यातील कळम तहसील मुसळ या गावातील त्या रहिवासी होत्या. प्राप्त माहितीनुसार, वर्षभरापूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले. घरासोबतच तीन आणि पाच वर्षांच्या मुलांची जबाबदारी आई मनीषावर आली. शेतमजुरी करून त्या घर चालवित होत्या.  मुलांना शिकवून मोठे करण्याचे त्यांचे स्वप्न होते. परंतु नियतीच्या मनात वेगळेच काही होते. तीन दिवसांपूर्वी कळम यवतमाळ येथून घरी परत येत असताना रस्त्यावरील उंच स्पीड ब्रेकर जीवघेणा ठरला. गाडी उसळल्याने त्या खाली पडल्या. डोक्याला गंभीर जखम झाली.

यवतमाळ रुग्णालयातून त्यांना थेट वर्धा सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रुरल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतरही त्यांची प्रकृती खालवत गेली. डॉ. चंद्रशेखर महाकाळकर, डॉ. तुषार पाटील, डॉ. इशान गडेकर, डॉ. संदीप इरटवार, डॉ. अमोल आंधळे व डॉ. प्रीन्स वर्मा या डॉक्टरांच्या चमूने मनीषा यांची तपासणी करून त्यांना ‘ब्रेन डेड’ म्हणजे मेंदू मृत घोषीत केले. जावयाच्या मृत्यूच्या दु:खातून सावरत नाही तोच मुलगी मनीषाचा मृत्यूने तिचे वडील रमेश पेंदोर व आई मंदा पेंदोर यांना मोठा आघात बसला. डॉक्टरांनी त्यांना अवयवदान करण्याविषयी समुपदेशन केले. त्यांनी अवयवदानाला संमती दिली. याची माहिती, विभागीय प्रत्यारोपण समितीचे (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. संजय कोलते व सचिव डॉ. राहुल सक्सेना यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनात प्रत्यारोपण समन्वयक दीनेश मंडपे यांनी अवयवदानाची प्रक्रीया पार पडली.

दोन महिलांना जीवनदान

मनीषा यांची एक किडनी आचार्य विनोबा भावे रुरल हॉस्पिटलमधीलच ४९वर्षीय महिलेला तर दुसरी किडनी याच हॉस्पिटलमधील २३ वर्षीय महिलेला दान करून जीवनदान दिले. मनीषा यांना ‘हेपेटायटिस’चा आजार असल्याने यकृताचे दान होऊ शकले नाही, अशी माहिती ‘झेडटीसीसी’ यांनी दिली. या वर्षातील हे १४वे अवयवदान असून आतापर्यंत १४४ दात्यांकडून अवयवदान झाले.

टॅग्स :nagpurनागपूर