शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
2
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
3
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
4
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
5
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
6
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
7
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
8
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
9
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
10
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
11
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
12
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
13
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
14
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
15
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

चिमुकल्याचा जीव वाचविण्यासाठी वडिलांचा संघर्ष

By admin | Published: January 10, 2015 2:36 AM

सत्तर टक्के जळलेल्या साडेचार वर्षाच्या क्रिष्णाला वाचविण्यासाठी त्याच्या वडिलाने अमरावतीहून नागपूर गाठले. मित्रांकडून उसनवारी घेऊन उपचार सुरू केला.

लोकमत मदतीचा हातनागपूर : सत्तर टक्के जळलेल्या साडेचार वर्षाच्या क्रिष्णाला वाचविण्यासाठी त्याच्या वडिलाने अमरावतीहून नागपूर गाठले. मित्रांकडून उसनवारी घेऊन उपचार सुरू केला. पैसे कमी पडत असल्याचे पाहता घरातील म्हैस, बकऱ्यासह सर्वकाही विकले. आता हातचे संपले क्रिष्णाला वाचविण्यासाठी आणखी दोन-अडीच लाखांची गरज आहे. क्रिष्णावर उपचार करण्याची कुटुंबाची परिस्थती राहिली नाही. त्यामुळे मुलाला जगवावे तरी कसे, या चिंतेने या गरीब कुटुंबाचे जगणे कठीण झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील रहिवासी असलेले देवीदास अडेकर असे त्या वडिलाचे नाव. तिवसा येथील एका सोनाराच्या दुकानात ते मजुरी करतात. तर क्रिष्णाची आई गृहिणी आहे. क्रिष्णाला वाचविण्यासाठी या दोघांची धडपड सुरू आहे. पण दारिद्र्यासमोर त्यांचे सर्व प्रयत्न थिटे पडत आहे. देवीदास यांनी ‘लोकमत’ला आपली आपबिती सांगितली. १५ डिसेंबर रोजीची ही घटना आहे. सकाळच्यावेळी क्रिष्णा घरात खेळत होता. त्याची आई बाहेरचे काम करीत होती. स्टोव्हवर आंघोळीचे पाणी तापत होते. पाणी आणखी गरम व्हावे म्हणून क्रिष्णाने स्टोव्हचा पंप जोरात मारला. यात स्टोव्ह समोर ढकल्याने कृष्णाच्या अंगावर उकळलेले पाणी पडले. अख्खे शरीर भाजले. अमरावतीच्या शासकीय रुग्णालयात क्रिष्णाला दाखल केले. डॉक्टरांनी ७० टक्के भाजल्याचे सांगितले. प्रकृती गंभीर असल्याने नागपुरात घेऊन जाण्याचा सल्लाही दिला. देवीदास यांनी मित्रांकडून पैसे उसने घेऊन नागपूर गाठले. धंतोलीतील चिल्ड्रेन हॉस्पीटलमध्ये क्रिष्णाला भरती केले. उपचार सुरू झाले. पैसा कमी पडत असल्याचे पाहता क्रिष्णाच्या वडिलाने घरातील म्हैस, बकऱ्या आणि जे विकण्यासारखे होते ते सर्व विकले. समाजाचे आर्थिक पाठबळ मिळाल्यास क्रिष्णा वाचेल, ही एकमेव आशा त्याचे वडील बाळगून आहेत. क्रिष्णाला जगविण्यासाठी हवा माणुसकीचा धर्मकोवळ्या वयातच नियतीचे कठोर आघात सोसण्याची वेळ निष्पाप क्रिष्णावर आली आहे. त्याला गरज आहे ती समाजाने मदतीचा हात देण्याची. हीच मदत त्याला पुन्हा एकदा लढण्याचे बळ-जगण्याची उभारी देऊ शकते. क्रिष्णाला मदत करू इच्छिणाऱ्यांनी तिवसा येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या बँक खाते क्रमांक ३१६४६९०५३३६ यावर धनादेश अथवा धनाकर्ष पाठवून करावी. देवीदास अडेकर यांच्याशी ९९२२५६३५७५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.क्रिष्णा प्रकृती गंभीरसाडेचार वर्षांचा क्रिष्णा ७० टक्क्यांवर भाजला आहे. प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावरील औषधांचा खर्च फार मोठा आहे. इस्पितळाकडून जे शक्य आहे ती मदत दिली जात आहे. -डॉ. सतीश देवपुजारी