शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

यंदाच्या दिवाळीत उपराजधानीत प्रदूषणाचा उच्चांक होण्याची भीती; एक्यूआरने ओलांडली धोक्याची पातळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2021 7:00 AM

Nagpur News यावर्षी उपराजधानीत फटाक्यांची आतषबाजी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. आधीच हवा गुणवत्ता इंडेक्स (एक्युआय) धोक्याचा स्तर पार करून १५१ वर पोहोचला आहे. त्यातच फटाक्यांमुळे प्रदूषणाचा स्तर तिपटीने वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देगुणवत्तेचा इंडेक्स १५१वर हवा

निशांत वानखेडेनागपूर : मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या परिस्थितीमुळे लोकांना मनाप्रमाणे सण, उत्सव साजरे करता आलेले नाहीत. मात्र, यावर्षी परिस्थिती सुधारली आहे. अशावेळी दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. त्यामुळे यावर्षी फटाक्यांची आतषबाजी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. आधीच हवा गुणवत्ता इंडेक्स (एक्युआय) धोक्याचा स्तर पार करून १५१ वर पोहोचला आहे. त्यातच फटाक्यांमुळे प्रदूषणाचा स्तर तिपटीने वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.दिवाळी आली की कमी फटाके फोडण्याचे आवाहन सर्वच प्रशासकीय संस्थांकडून केले जाते. लोकांमध्ये याबाबत जागृती होत असली तरी बहुतेकांचा फटाक्यांचा मोह सुटत नाही. त्यामुळे दिवाळीच्या काळात प्रदूषणाच्या स्तरात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसते. नागपूरच्या वातावरणातील सर्वाधिक प्रदूषित घटक म्हणून धुलीकण म्हणजे 'पार्टिकुलेट मॅटर' (पीएम - २.५ व पीएम - १०)चा समावेश आहे. विकास प्रकल्प, उद्योग तसेच बांधकामात वाढ झाल्याने त्याचे प्रमाण वाढले आहे. फटाक्यांमुळे धुलीकणांत वाढ तर होतेच, शिवाय सल्फर डायआॅक्साईड, नायट्रोजन डायआॅक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, अमोनिया, लेड, निकेल, आर्सेनिक, ओझोन ३ व इतर घटकांमध्येही वाढ झाल्याचे दिसून येते.

२०१३ पासून सातत्याने वाढ२०१३ मध्ये दिवाळीत पीएम - १०चे प्रदूषण सदरमध्ये सर्वाधिक २३४ मायक्रोग्रॅम पर क्युबिक मीटर (एमपीसीएम) होते. २०१४  मध्ये उत्तर अंबाझरी मार्गावर २३४ एमपीसीएम व सदर भागात २७० एमपीसीएम होते. २०१५मध्ये हा स्तर उत्तर अंबाझरी मार्गावर स्टॅन्डर्ड स्तराच्या तिप्पट म्हणजे ३०५ एमपीसीएमवर पोहोचला होता. दिवाळीनंतरच्या दुस?्या दिवशी २११ एमपीसीएम होता. २०१६मध्ये सिव्हील लाईन्स, अंबाझरी व सदर भागात अनुक्रमे १६१, १३५ व १७५वर होता. २०१७मध्ये फटाक्यांमुळे पाचपट वाढ झाली व ५०० एमपीसीएमवर पोहोचल्याची नोंद आहे.एअर क्वालिटी इंडेक्समध्ये वाढ- २०१६मध्ये एक्युआय १३८, २०१७मध्ये १८२, २०१८मध्ये २२२, २०१९मध्ये ११५ तर २०२०मध्ये १६८ एक्युआय.- पीएम - २.५ २०१७मध्ये ५०.२ एमपीसीएम, २०१८मध्ये ४६.६ एमपीसीएम, २०१९मध्ये ४७.२ एमपीसीएम.रात्री ८ ते १० ची मुदत निष्प्रभ२०१९ साली केंद्रीय वन, पर्यावरण मंत्रालयाने फटाक्यांवर नियंत्रणासाठी रात्री ८ ते १० वाजेपर्यंत फटाके फोडण्याची मुदत दिली होती. मागील वर्षी हे निर्देशही निष्प्रभ ठरले. रात्री ८ पूर्वीच सुरू झालेली आतषबाजी उशिरा रात्री २.३०पर्यंत चालली.

नीरी ठेवणार नजरराष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) दरवर्षीप्रमाणे यावेळीही दिवाळीपूर्वी आणि दिवाळीनंतरच्या प्रदूषण स्तरावर व त्यातील घटकांवर नजर ठेवणार आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषण