लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) विनंतीवरून महापालिकेचे पथक श्वान पकडण्यासाठी आले. बराच वेळ त्यांनी श्वानांचा शोध घेतला. परंतु त्यांना पाहून ते पळाले होते. पथकाला केवळ एक श्वान सापडला. ते त्याला घेऊन गेट बाहेर जाताच श्वानांनी पुन्हा गर्दी केली. ही आश्चर्य करणारी घटना गुरुवारी रविभवनात पाहायला मिळाली.रविभवनात मंत्र्यांचे कॉटेज आहेत. कोविड-१९ मुळे सध्या येथे केवळ गृहमंत्री अनिल देशमुख यांचेच कार्यालय सुरू आहे. पालकमंत्र्यांचे कार्यालय ऊर्जा अतिथीगृहात शिफ्ट झाले आहे. यासोबतच येथे क्वारंटाईन सेंटर बनवण्यात आले आहे. सध्या येथे कोविड-१९ ची टेस्ट केली जात आहे. रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या राहण्याची व्यवस्थाही येथे करण्यात आली आहे. या परिसरात मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणावर श्वान फिरत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मनपाला श्वान पकडण्याची विनंती केली. यानंतर गुरुवारी दुपारी मनपाचे पथक येथे पोहोचले. त्यांनी श्वानांचा खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना कुठेही श्वान आढळून आले नाही. त्यांच्या हाती केवळ एकच श्वान लागले. परंतु मनपाचे पथक रविभवनाच्या गेटबाहेर जाताच पुन्हा पीडब्ल्यूडी कार्यालयासमोर श्वानांनी गर्दी केली.बिस्कीटची सवय लावली तर फसतीलमनपाचे कर्मचारी रविभवनातून जाण्यापूर्वी पीडब्ल्यूडीचे अभियंता चंद्रशेखर गिरी यांना घडलेल्या प्रकाराची माहिती देण्यासाठी पोहोचले. त्यांनी सांगितले की, केवळ एकच श्वान सापडला. त्याला पकडण्यात आले. या कर्मचाऱ्यांनी पीडब्ल्यूडीला जाताना असा सल्लाही दिला की, या श्वानांना बिस्कीट खाण्याची सवय लावण्यात यावी. बिस्कीटच्या मदतीने त्यांना एका खोलीत बंद करण्याचा प्रयत्न केला जाईल. या श्वानांची नसबंदी करून त्यांना पुन्हा परिसरातच सोडण्यात येईल, असेही सांगितले.
मनपाच्या पथकाला श्वानांची हुलकावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2020 10:29 PM
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) विनंतीवरून महापालिकेचे पथक श्वान पकडण्यासाठी आले. बराच वेळ त्यांनी श्वानांचा शोध घेतला. परंतु त्यांना पाहून ते पळाले होते. पथकाला केवळ एक श्वान सापडला. ते त्याला घेऊन गेट बाहेर जाताच श्वानांनी पुन्हा गर्दी केली.
ठळक मुद्दे रविभवनातील घटना : पकडणारे येताच पळाले होते