लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कर्तव्यदक्षता बाळगून अपघात टाळणाºया रेल्वे कर्मचाºयांचा मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील चंद्रपूर युनिट क्रमांक १२ मधील कि मेन अमृत गायधने यांना ९ आॅक्टोबर २०१७ रोजी किलोमीटर क्रमांक ८७०/७-९ येथे फिश प्लेटला तडा गेल्याचे समजले. त्याची सूचना त्यांनी लगेच अधिकाºयांना दिल्यामुळे संभाव्य अपघात टाळता आला. २२ सप्टेबर २०१७ रोजी रेल्वे रुळाची देखभाल करणारे बैतुल येथील श्रीराम मुन्नालाल यांना अपलाईनवर वेल्डींग फ्रॅक्चर असल्याचे कळताच त्यांनी याची सूचना दिली. तर किसनलाल बारीक यांनी २२ सप्टेबरला रेल्वे रुळाला तडा गेल्याचे लक्षात आणून दिले. २८ जुलै २०१७ रोजी वरुड गेटजवळ ब्लॉक असल्यामुळे बूम लॉक केले. काही व्यक्तींनी बूम काढण्यासाठी त्यांना मारहाण केली. परंतु संभाव्य अपघात टाळण्यासाठी त्यांनी बूम काढला नाही. या सर्व कर्मचाºयांना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी वैयक्तिक पुरस्काराने गौरविण्यात आले.
कर्तव्यदक्ष कर्मचाºयांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 1:38 AM