शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

पेंच वनपरिक्षेत्रात मृतावस्थेत आढळली मादी बिबट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 9:59 PM

leopard dead पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत पूर्व पेंच वनपरिक्षेत्रातील पूर्व नियतक्षेत्राच्या कक्ष क्रमांक ५१५ मध्ये एक मादी बिबट मृतावस्थेत आढळून आली. तिचे वय दाेन वर्षाचे असल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत पूर्व पेंच वनपरिक्षेत्रातील पूर्व नियतक्षेत्राच्या कक्ष क्रमांक ५१५ मध्ये एक मादी बिबट मृतावस्थेत आढळून आली. तिचे वय दाेन वर्षाचे असल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला.

मिळलेल्या माहितीनुसार, बुधवारी या वनक्षेत्रात गस्तीवर असलेले वनरक्षक व वनकर्मचाऱ्यांना बिबट्याचे शव आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक अमलेंदू पाठक, सहायक वनसंरक्षक किरण पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. चेतन पाताेंडे घटनास्थळी पाेहचले. बिबट्याच्या शरीरावरील झटापटीच्या खुणा दिसून आल्या. यावरून एखाद्या हिंस्र प्राण्याशी झालेल्या झुंजीत तिचा मृत्यू झाल्याची शक्यता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे घटनास्थळाच्या १००० मीटरच्या परिघात दुसऱ्या प्राण्याच्या अस्तित्वाचा तपास वनकर्मचारी करीत आहेत. दरम्यान, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनानुसार मृत बिबट्याचे शवविच्छेदन करून रीतसर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पवनी आरएफओ प्रतीक मोडवान, चाेरबाहुली आरएफओ प्रदीप संकपाळ, पेंचचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन पातोंडे, पशुधन विकास अधिकारी डाॅ. दत्ता जाधव, यश दाभोळकर, सहदेव टेकाम आदी उपस्थित होते. वनपाल राजीव मेश्राम तसेच वनरक्षक महेश गायकवाड या घटनेबाबत अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :leopardबिबट्याDeathमृत्यू