शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

फौजदाराला अटक आणि जामीन

By admin | Published: July 28, 2016 2:50 AM

बलात्काराची तक्रार द्यायला गेलेल्या तरुणीला पोलीस आयुक्तालयाजवळून आपल्या घरी नेऊन तिच्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या...

बलात्कारीत तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : पोलीस दलात खळबळ नागपूर : बलात्काराची तक्रार द्यायला गेलेल्या तरुणीला पोलीस आयुक्तालयाजवळून आपल्या घरी नेऊन तिच्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या फौजदाराला (एएसआय) सदर पोलिसांनी अटक केली; नंतर कोर्टातून त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.अवघ्या पोलीस दलाची मान लाजेने खाली घालू पाहणाऱ्या या प्रकरणाची तक्रार पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांच्याकडे सोमवारी करण्यात आली. त्यामुळे त्यांनी त्याची दखल घेत आयुक्तांनी दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आरोपी एएसआय अल्ताफ अहमद गनी अहमद (वय ५७) याच्याविरुद्ध सदर पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून मंगळवारी सकाळी त्याला अटक करण्यात आली. त्याला कोर्टात हजर करून त्याच्या पीसीआरची मागणी करण्यात आली. मात्र, दोन्ही बाजू विचारात घेऊन कोर्टाने अल्ताफची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्याच्या वकिलांनी लगेच जामिनासाठी अर्ज सादर केला. तो मंजूर करण्यात आल्याने अल्ताफची सुटका करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणातील पीडित तरुणीच्या सांगण्यावरून मंगळवारी घटनास्थळाचे अवलोकन करतानाच कपडेही जप्त करण्यात आले. अल्ताफवर निलंबनाची कारवाई होण्याचे संकेत आहे. वृत्त लिहिस्तोवर तसा आदेश निघाल्याची माहिती नव्हती.(प्रतिनिधी)