लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अगोदरच कोरोनाचा सामना करत असतानाच नवतपाने नागपूरकर हैराण झाले आहेत. मंगळवारी नागपुरात ४६.८ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदविण्यात आले. विदर्भात सर्वात जास्त तापमान नागपुरातच होते. उष्णतेची लाट कायम असून पुढील आठवड्याभर तापमान ४६ अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक तापमान राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.सोमवारी ४७ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आल्यानंतर मंगळवारी पारा आणखी वर जातो की काय अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र मंगळवारी कमाल ४६.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. सोमवारहून हे तापमान ०.२ अंशानी कमी होते. परंतु सरासरीहून ३.६ अंश सेल्सिअस अधिक होते. किमान २६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीहून २.२ अंश सेल्सिअसहून कमी होते.२९ मे पर्यंत उष्णतेची लाट कायम राहील. शिवाय २८ मेपर्यंत ‘रेड अलर्ट’ आहे असे हवामान खात्याने घोषित केले आहे.विदर्भात अकोला येथे ४६.५, वर्धा येथे ४६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, यवतमाळ येथेदेखील ४५ अंश सेल्सिअसहून अधिक तापमान होते.विदर्भातील तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)अकोला ४६.५अमरावती ४५.६बुलडाणा ४३.०ब्रह्मपुरी ४३.९चंद्रपूर ४५.२गडचिरोली ४३.४गोंदिया ४५.०नागपूर ४६.८वर्धा ४६.०वाशीम ४३.८यवतमाळ ४५.५
नवतपाचा ताप सुरूच : नागपूर @ ४६.८
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 10:26 PM
अगोदरच कोरोनाचा सामना करत असतानाच नवतपाने नागपूरकर हैराण झाले आहेत. मंगळवारी नागपुरात ४६.८ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदविण्यात आले. विदर्भात सर्वात जास्त तापमान नागपुरातच होते.
ठळक मुद्देउष्णतेची लाट व ‘रेड अलर्ट’ कायमच