माजी मंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात फिल्डिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 01:12 AM2018-07-03T01:12:33+5:302018-07-03T01:15:20+5:30
उत्तर नागपुरातील काँग्रेसचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ दिल्ली येथे दाखल झाले आहे. शिष्टमंडळाने सोमवारी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे व अशोक गहलोत यांची भेट घेऊन माजी मंत्री नितीन राऊ त यांच्या विरोधात तक्रार करून अहवाल सादर केला. तसेच प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह अन्य नेत्यांच्या भेटी घेऊन राऊ त यांच्या विरोधात तक्रार केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपुर : उत्तर नागपुरातील काँग्रेसचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ दिल्ली येथे दाखल झाले आहे. शिष्टमंडळाने सोमवारी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे व अशोक गहलोत यांची भेट घेऊन माजी मंत्री नितीन राऊ त यांच्या विरोधात तक्रार करून अहवाल सादर केला. तसेच प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह अन्य नेत्यांच्या भेटी घेऊन राऊ त यांच्या विरोधात तक्रार केली.
शिष्टमंंडळात विवेक निकोसे, सुरेंद्र चव्हाण, धरमकुमार पाटील, नगरसेवक मनोज सांगोळे, संदीप सहारे, मिलिंद सोनटक्के, हरविंदरसिंग लोहिया, इर्शाद मलिक, पंकज लोणारे, आसिफभाई शेख, प्रशांत उके, बबन सोमकुुंवर यांच्यासह ३० ते ३५ पदाधिकाऱ्यांचा शिष्टमंडळात समावेश आहे. पदाधिकारी व नगरसेवक सकाळी दिल्लीत पोहचले होते. मात्र संदीप सहारे महापालिकेची सर्वसाधारण सभा आटोपून दिल्लीला गेले.
उत्तर नागपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. मात्र नितीन राऊ त यांनी पक्षाचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना दूर केल्याने गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला. तसेच लोकसभा निवडणुकीतही या विधानसभा क्षेत्रात पक्षाची मते कमी झाल्याचे मल्लिकार्जुन खरगे व अशोक गहलोत यांच्या निदर्शनास आणले. शिष्टमंडळ दिल्लीत तळ ठोकून असून, मंगळवारीही काँग्रेस नेत्यांच्या भेटी घेणार असल्याची माहिती संदीप सहारे यांनी दिली. यासंदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी नितीन राऊत यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.