शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

माजी मंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात फिल्डिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 1:12 AM

उत्तर नागपुरातील काँग्रेसचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ दिल्ली येथे दाखल झाले आहे. शिष्टमंडळाने सोमवारी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे व अशोक गहलोत यांची भेट घेऊन माजी मंत्री नितीन राऊ त यांच्या विरोधात तक्रार करून अहवाल सादर केला. तसेच प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह अन्य नेत्यांच्या भेटी घेऊन राऊ त यांच्या विरोधात तक्रार केली.

ठळक मुद्देमाजी मंत्री नितीन राऊ त यांच्याविरोधात फिल्डिंग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपुर : उत्तर नागपुरातील काँग्रेसचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ दिल्ली येथे दाखल झाले आहे. शिष्टमंडळाने सोमवारी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे व अशोक गहलोत यांची भेट घेऊन माजी मंत्री नितीन राऊ त यांच्या विरोधात तक्रार करून अहवाल सादर केला. तसेच प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह अन्य नेत्यांच्या भेटी घेऊन राऊ त यांच्या विरोधात तक्रार केली.शिष्टमंंडळात विवेक निकोसे, सुरेंद्र चव्हाण, धरमकुमार पाटील, नगरसेवक मनोज सांगोळे, संदीप सहारे, मिलिंद सोनटक्के, हरविंदरसिंग लोहिया, इर्शाद मलिक, पंकज लोणारे, आसिफभाई शेख, प्रशांत उके, बबन सोमकुुंवर यांच्यासह ३० ते ३५ पदाधिकाऱ्यांचा शिष्टमंडळात समावेश आहे. पदाधिकारी व नगरसेवक सकाळी दिल्लीत पोहचले होते. मात्र संदीप सहारे महापालिकेची सर्वसाधारण सभा आटोपून दिल्लीला गेले.उत्तर नागपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. मात्र नितीन राऊ त यांनी पक्षाचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना दूर केल्याने गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला. तसेच लोकसभा निवडणुकीतही या विधानसभा क्षेत्रात पक्षाची मते कमी झाल्याचे मल्लिकार्जुन खरगे व अशोक गहलोत यांच्या निदर्शनास आणले. शिष्टमंडळ दिल्लीत तळ ठोकून असून, मंगळवारीही काँग्रेस नेत्यांच्या भेटी घेणार असल्याची माहिती संदीप सहारे यांनी दिली. यासंदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी नितीन राऊत यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊतcongressकाँग्रेस