लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भ साहित्य संघाने आपल्या प्रमुख वार्षिक साहित्य संमेलनाव्यतिरिक्त विविध प्रवाही संमेलनेही आयोजित केलेली आहेत. याच परंपरेत यावर्षी विदर्भ साहित्य संघाचे पाचवे बाल-कुमार साहित्य संमेलन अकोला येथे १ व २ डिसेंबर रोजी होणार आहे.विदर्भ साहित्य संघाची अकोला शाखा संमेलनाची निमंत्रक असून प्रभात किड्स स्कूल ही संस्था प्रमुख आयोजक आहे. सुप्रसिद्ध कवी व बाल साहित्यिक शंकर कºहाडे यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. विदर्भ साहित्य संघाच्या घटनेनुसार संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी आयोजक संस्थेला तीन नावांची शिफारस केली जाते. त्यातून अकोला येथील आयोजक संस्थेने शंकर कºहाडे यांच्या नावाला मान्यता दिली असून, त्यांच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब केले आहे. विदर्भ साहित्य संघाच्या रविवारी झालेल्या कार्यकारी मंडळाच्या सभेत या प्रस्तावास मान्यता प्रदान करण्यात आली. अखिल भारतीय बाल-कुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष व प्रसिद्ध कवयित्री तसेच बाल साहित्य लेखिका डॉ. संगीता बर्वे यांचे हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
पाचवे बाल-कुमार साहित्य संमेलन अकोल्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:19 AM
विदर्भ साहित्य संघाने आपल्या प्रमुख वार्षिक साहित्य संमेलनाव्यतिरिक्त विविध प्रवाही संमेलनेही आयोजित केलेली आहेत.
ठळक मुद्देशंकर कºहाडे संमेलनाध्यक्षपदी : विदर्भ साहित्य संघाचे आयोजन