लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, स्टार प्रचारक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाररसभांची फिप्टी मारली आहे. पहिल्या टप्प्यातील नागपूर लोकसभेची निवडणूक आटोपल्यानंतर गडकरी आता देशभरातील प्रचारासाठी अधिक सक्रिय झाले आहेत.निवडणुकीच्या पूर्वी गडकरी यांची प्रकृती ठीक नव्हती. मात्र, अशाही परिस्थितीत त्यांनी पक्षाच्या प्रचार सभांचे आव्हान स्वीकारले. देशभरात पहिल्या तीन टप्प्यातील मतदान झालेल्या भागात गडकरींनी ५० सभा घेतल्या आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात त्यांनी तब्बल २७ सभा घेत प्रचाराची धुरा सांभाळली आहे. महाराष्ट्रात गडचिरोली, चंद्रपूर, रामटेक,अमरावती,वर्धा, लातूर,सोलापूर, जालना, सांगली, माढा, पुणे, बारामती, मुंबई, रायगड, औरंगाबाद, शिरूर, मावळ हे मतदारसंघ त्यांनी पिंजून काढले.गडकरी विदर्भ किंवा महाराष्ट्रापुरतेच थांबले नाहीत तर त्यांनी देशभरातील विविध राज्यातही सभा घेत भाजपला बळकटी देण्याचे काम केले.गोवा, बिहार, दिल्ली, ओडिशा, छत्तीसगड़, तामिळनाडू या राज्यातही त्यांनी भाजपचा आवाज बुलंद केला. गडकरी यांनी आपल्या मंत्रालयामार्फत केलेले रस्ते ,सिंचन आणि गंगा शुद्धिकरणाच्या कामाचा आढावा देशातील प्रचार सभांमध्ये मतदारांसमोर मांडला. गडकरी यांच्या नवनवीन 'आयडिया' ऐकण्यासाठी युवा वर्ग उत्सुक आहेत. त्यांचा विकासाचा आलेख पाहून भाजपातील बहुतांश उमेदवारांनी पक्षाकडे गडकरी यांच्या प्रचारसभांची मागणी नोंदविली आहे.चौथ्या टप्प्यातही राहणार सक्रियगडकरी हे लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातही प्रचारात सक्रिय राहणार आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल यासह देशभरात विविध ठिकाणी गडकरी यांच्या प्रचारसभा होणार आहेत.
गडकरींनी मारली प्रचार सभांची फिप्टी : महाराष्ट्रात २७ सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 9:33 PM
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, स्टार प्रचारक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाररसभांची फिप्टी मारली आहे. पहिल्या टप्प्यातील नागपूर लोकसभेची निवडणूक आटोपल्यानंतर गडकरी आता देशभरातील प्रचारासाठी अधिक सक्रिय झाले आहेत.
ठळक मुद्देपहिल्या तीन टप्प्यात प्रचाराचा झंझावात