शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणाची मध्यस्थी फळली? हमास-इस्त्रायल युद्ध थांबणार; या छोट्या देशाने निभावली महत्वाची भुमिका
2
मुहूर्त ठरला! अजितदादांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागणार; माजी महापौरांसह नगरसेवकांच्या हाती लवकरच तुतारी 
3
कहरच झाला! साप दोनवेळा डसला म्हणून तरुण त्याला तीनवेळा चावला; साप मेला, तरुण वाचला
4
"राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून मला केवळ देवच बाहेर करू शकतो", जो बायडन यांनी ठणकावले  
5
PHOTOS : "चमत्कार आणि...", अभिषेक शर्माची 'लकी चार्म', युवा खेळाडूची बहीण डॉक्टर कोमल शर्मा!
6
Budget 2024: अर्थसंकल्पातून नोकरदार वर्गासाठी मोठी गिफ्ट देणार का सरकार? 'या' ३ घोषणा होण्याची शक्यता
7
इराणमध्ये सत्तांतर! सुप्रिम लीडर खामेनेईंचा उमेदवार पडला; मसूद पेझेश्कियान नवे राष्ट्रपती
8
"सरकारी तिजोरीतून ११ कोटी देण्याची गरज काय?"; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर वडेट्टीवारांचा सवाल
9
आजपासून सुरू होणारे नीटचे कौन्सिलिंगची स्थगित; नवीन तारखा लवकरच जाहीर होणार
10
काँग्रेसची रणनीती की मविआत दबावतंत्राचं राजकारण?; ठाकरे-पवारांचं टेन्शन वाढणार
11
मुलीसुद्धा डेटवर जातात, मग एकट्या मुलावर कारवाई कशासाठी? कोर्टाने उपस्थित केला सवाल
12
Gold Price : सोन्याच्या दरात पुन्हा वाढ! तपासा तुमच्या शहरातील दर
13
भारतात २० ऑटो कंपन्या, कित्येकांचे तर नावालाच अस्तित्व...; जूनमध्ये कोणी किती कार विकल्या?
14
BRS ला मोठा झटका! ६ आमदारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; विधान परिषदेचं संख्याबळ वाढणार
15
मोठी बातमी: पंचवटी एक्स्प्रेसला कसाऱ्यात अपघात; दोन डबे झाले वेगळे
16
पोलीस ठाण्यात महिला अधिकाऱ्याला पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न; बाईक अडवल्याचा होता राग
17
"गैरसमजातून घोटाळ्याची तक्रार"; वायकरांना क्लीन चीट मिळाल्यानंतर काँग्रेस म्हणतं, "उमेदवार झाले तेव्हाच..."
18
आम्ही १३ तारखेपर्यंत सरकारवर आशा ठेवून आहोत, नंतर...; मनोज जरांगे नक्की काय म्हणाले?
19
दर महिन्याला EMI भरावा लागत नाही असं लोन माहितीये का? इमर्जन्सीमध्ये येऊ शकतं कामी
20
"BMCने गैरसमजातून तक्रार केली होती"; शिंदेसेनेचे खासदार रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चिट

अंजीर हलवा, डब्बा चाय, खजूर बर्फी, मिरची भजी आणि बरेच काही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 1:01 PM

रमजान ईदनिमित्त शहरातील मोमिनपुरा भागात सजलेल्या रमजान मार्केटला नागपूर फुडीज या सोशल मिडियावर लोकप्रिय असलेल्या खवैय्या ग्रूपने अलीकडेच भेट दिली.

ठळक मुद्देनागपूर फूडीजने केला मोमिनपुरा भागात फूड वॉकअनुभवली चविष्ट पदार्थांची मांदियाळी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: रमजान ईदनिमित्त शहरातील मोमिनपुरा भागात सजलेल्या रमजान मार्केटला नागपूर फुडीज या सोशल मिडियावर लोकप्रिय असलेल्या खवैय्या ग्रूपने अलीकडेच भेट दिली. या ग्रूपचे अ‍ॅडमिन प्रणय पाटील आणि शोएब मेमन यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या या फूड वॉकचा आनंद ग्रूपच्या सदस्यांनी मनमुराद लुटला.मोमिनपुरा भागात दरवर्षी रमजान महिन्यानिमित्त बाजार भरतो. विशेष म्हणजे तो रात्रभर सुरू असतो. बाजारात खाद्यपदार्थांची रेलचेल असते, कपड्यांची दुकाने सजलेली असतात आणि दागिन्यांच्या दुकानातील झळाळीने अवघा बाजार चमचमत असतो. सामिष-निरामिष आहाराचे अनेकोनेक उत्तम पदार्थ येथे उपलब्ध असतात.नागपूर फूडीजचे अक्षय, आदिती, अपूर्व, योगेश यांच्यासह बरीचशी तरुणाई मंडळी नागपुरातल्या कडक उन्हाची, घामांच्या धारांची पर्वा न करता साडेपाचच्या सुमारास बाजारात हजर झाले होते. ईदनिमित्त आलेल्या मुस्लीम बांधव व स्त्रियांची प्रचंड गर्दी, धक्काबुक्की, खेचाखेच यांना पार करत नागपूर फूडीजने आपला फूड वॉक सुरू केला.सर्वात प्रथम थंडगार आम का पन्हा पोटात गेल्यावर सर्वांनाच बरे वाटले. नंतर मोर्चा वळवला तो मिरची पकोड्यांकडे. त्यासोबत चटपटीत चणा होताच. त्या पाठोपाठ रोल्सही आले. आता सर्वांनाच चहा हवा होता. या ठिकाणी प्रथमच सगळ््यांना डब्बा चहा अनुभवायला मिळाला. एका स्टीलच्या छोट्याशा मगमध्ये खारीचा चुरा, खारट बिस्किटाचा चुरा आणि लहानसा रोट असे ठेवून त्यावर चहा ओतला की तयार झाला डब्बा चहा. लहानपणी चहाच्या किंवा दुधाच्या कपात बिस्किटाचा पडलेला तुकडा चमच्याने खाण्यातली मौज सर्वांनीच बऱ्याच वर्षांनी मनमुराद अनुभवली. त्यानंतर समोर आला तो अंजीर हलवा. लहानशा कपातला हा हलवा तोंडात ठेवला की विरघळून जात होता. या सर्वांच्या जोडीला आंब्याचा रस, खजुराची बर्फी, मूगडाळीचा हलवा, गुलाबजाम, फालुदा ही मंडळीही हजर होतीच. मध्येच एकदा येथील फेमस लस्सीही पोटात गेली. किती खावे आणि काय काय खावे असे झाले होते. मोमिनपुरा भागातील या फूड वॉकची सरतेशेवटी उत्तम दर्जाच्या बिस्किटे व नानकटाईने सांगता करण्यात आली.नागपूर फूडीजतर्फे असे अनेक फूड वॉक वेळोवेळी काढण्यात येत असतात अशी माहिती ग्रूप अ‍ॅडमिन प्रणय पाटील यांनी दिली. 

टॅग्स :Ramzan Eidरमजान ईद