शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

मराठी भाषिकांचा लढा जोमाने वाढतो आहे; लढ्याच्या कार्यकर्त्यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 1:32 PM

मराठी भाषिकांची चळवळ ढासळली असे म्हणणे चुकीचे आहे. उलट आधीपेक्षा ही चळवळ अधिक जोमाने वाढत आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र सरकार उदासीन

निशांत वानखेडे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: मराठी भाषिकांच्या अस्मितेचे राजकारण करणाऱ्या महाराष्ट्रातील राष्ट्रीय पक्षांनी राजकीय प्रलोभने दाखवून मराठी माणसांमध्ये फूट पाडली. दुसरीकडे काही संघटना हिंदुत्वाच्या नावाने तरुणांची दिशाभूल करीत आहेत. याचमुळे कर्नाटक विधानसभेत मराठी भाषिक उमेदवारांचा पराभव झाला. मात्र निवडणुकीच्या यशापयशातून या महाराष्ट्रात विलिनीकरणासाठी सुरू असलेल्या लढ्याचे आकलन करणे योग्य नाही. कारण गेल्या ६२ वर्षापासून तो सुरू आहे. कारण सीमावर्ती भागात मराठी भाषिकांचे ऐक्य कायम आहे. बेळगाव महापालिकेच्या सत्तेमध्ये आतापर्यंत मराठी भाषिकांचे वर्चस्व राहिले आहे. बेळगावच्या आसपासच्या ग्रामीण भागामध्येही ही स्थिती आहे. त्यामुळे मराठी भाषिकांची चळवळ ढासळली असे म्हणणे चुकीचे आहे. उलट आधीपेक्षा ही चळवळ अधिक जोमाने वाढत आहे. यावर्षी आम्ही अधिक जोमाने आणि व्यापक प्रमाणात मिरवणूक काढणार असल्याची भावना महाराष्ट्र एकत्रीकरण समितीचे प्रा. आनंद मेनसे, नागेश सातारी, मालोजी आष्टेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.१ नोव्हेंबर १९५६ रोजी भाषावार प्रांतरचनेनुसार कर्नाटक राज्य निर्मितीच्या प्रक्रियेत मराठी असूनही बेळगाव, कारवार आदी भाग कानडी राज्यात समाविष्ट करण्यात आला. त्यावेळी या निर्णयाचा विरोध करीत महाराष्ट्रात विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी एक मोठी निषेध मिरवणूक मराठी माणसांनी काढली आणि तेव्हापासूनच या आंदोलनाची ठिणगी पेटली. वर्षभर मराठी अस्मिता जोपासणारे मराठी भाषिक यादिवशी एकत्र येउन शांततामय मार्गाने आंदोलन करतात. काळे वस्त्र परिधान केलेले, काळ्या फिती लावलेले ४० ते ५० हजार लोक रस्त्यावर उतरून मूक मिरवणूक काढत सरकारचा निषेध करतात. ग्रामीण भागातही या आंदोलनाला उत्स्फू र्त प्रतिसाद मिळतो. दरवर्षी या मिरवणुकीच्या परवानगीसाठीही मराठी जनांना संघर्ष करावा लागतो. आंदोलनाच्या आदल्या रात्री त्यांना परवानगी दिली जाते, तरीही स्वयंस्फूर्तीने हजारो मराठी भाषिक रस्त्यावर उतरतात. यावेळीची राजकीय परिस्थिती मात्र वेगळी आहे. दरवेळी या भागातून चार मराठी आमदार कानडी विधानसभेत निवडून जात होते. यावेळी मात्र महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी मांडलेल्या फाटाफुटीमुळे एकही आमदार विधानसभेत पोहचला नाही. याच स्थितीचा फायदा घेत कर्नाटक सरकार पुरस्कृत कानडी संघटना व प्रशासन महाराष्ट्र एकीकरण समितीची चळवळ कोलमडल्याचा अपप्रचार करून मराठी भाषिकांच्या आंदोलनाला आडकाठी करण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळे सीमाभागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

११ बळी अन् दरवर्षी लाठ्यामराठी भाषिकांतर्फे आजपर्यंत शांततेच्या मार्गाने मूक मिरवणूक आणि आंदोलन करण्यात आले असले तरी कर्नाटक प्रशासनाने शक्य तो प्रयत्न करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आहे. आंदोलनासाठी आयुष्य समर्पित केलेले ९१ वर्षीय कृष्णा मेनसे यांचे पुत्र प्रा. आनंद मेनसे यांनी सांगितले, १९८६ साली शरद पवार यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनावर पोलिसांनी गोळीबार केला होता व यामध्ये ११ मराठी भाषिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर झालेल्या एका सत्याग्रहात प्रशासनाने ४००० च्यावर कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकले व अनेक केसेस लावल्या. दरवर्षी मिरवणूक दडपण्यासाठी पोलिसांकडून लाठीमार केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी अस्मितेचे आंदोलन चिरडण्यासाठी कानडी सरकार आता अधिक दडपशाही करीत असल्याचे प्रा. मेनसे यांनी सांगितले.

महाराष्ट्र सरकार उदासीनअनेक प्रकारची दडपशाही आणि अपमान सहन करीत मराठी भाषिक अबालवृद्ध अस्मितेचे आंदोलन पुढे चालवित आहेत. मात्र मराठी जनांच्या लढ्याकडे महाराष्ट्र सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याची टीका नागेश सातारी यांनी केली. महाराष्ट्राच्या दुर्लक्षामुळे केंद्र सरकारही या लढ्याची दखल घेत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. वर्तमान मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात पंतप्रधानांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले, मात्र पुढे काही झाले नाही. २००० साली बेळगाव येथे झालेल्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषिकांचा लढा न्यायालयात नेण्याचा ठराव मांडण्यात आला. त्यानंतर मुंबईत झालेल्या पत्रकार व कार्यकर्त्यांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्र शासनाने हा वाद सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे.

टॅग्स :marathiमराठी