भूमापक : अभियंत्यांच्या समकक्ष काम करूनही लिपिकाचे वेतनविलास गावंडे - यवतमाळकनिष्ठ अभियंत्यांच्या समकक्ष कामे करावी लागत असतानाही भूमी अभिलेख विभागातील भूमापकांना लिपिकाएवढ्या वेतनावर काम करावे लागत आहे. शासनाने या विभागाला तांत्रिक खाते घोषित करावे, या मागणीसाठी आता लढा उभारला जात आहे. या विभागात भूमापक म्हणून नियुक्तीसाठी पूर्वी दहावी उत्तीर्ण, इंग्रजी, मराठी टंकलेखन एवढीच पात्रता होती. डिसेंबर २०११ मध्ये या विभागाने सेवा प्रवेश नियमांमध्ये दुरुस्ती केली. यानुसार दोन वर्षांचा आयटीआयचा सर्वेअर अभ्यासक्रम आणि तंत्रनिकेतनची पदविका प्राप्त उमेदवाराला या पदासाठी संधी दिली जात आहे. मात्र वेतनश्रेणी लिपिकाची दिली जात आहे. सध्या त्यांना सुमारे १५ हजाराच्या आसपास वेतन मिळते.या विभागाला तांत्रिक खाते अशी मान्यता मिळाल्यास भूमापकांना सुमारे २४ हजार रुपयांपर्यंत वेतन मिळू शकते. या विभागात ७५ टक्क्यावर कर्मचारी तांत्रिक स्वरूपातील कामे करणारी आहेत. इतर प्रवर्गातील केवळ २५ टक्के कर्मचारी आहेत. यानंतरही विभागाला तांत्रिक मान्यता दिली जात नाही. त्यामुळेच आता आंदोलनात्मक मार्ग स्वीकारून ही मागणी पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न आहे.
भूमी अभिलेख विभागाला तांत्रिक मान्यतेसाठी लढा
By admin | Published: July 28, 2014 1:25 AM