शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
2
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
3
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
4
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
5
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
6
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
7
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाणाले?
8
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
9
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
10
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
11
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
12
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
13
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
14
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
15
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
16
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
17
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
18
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
19
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
20
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

उद्धव ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करा; भाजप विधी आघाडीची पोलिसांत तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2023 9:05 PM

Nagpur News उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरचे कलंक असल्याचे वक्तव्य केल्याबद्दल भाजपच्या विधी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरचे कलंक असल्याचे वक्तव्य केल्याबद्दल भाजपच्या विधी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. उद्धव ठाकरे यांनी जाणुनबुजून असे वक्तव्य करत समाजात तेढ निर्माण करत राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.

विधी आघाडीचे अध्यक्ष ॲड.परिक्षीत मोहिते यांच्या नेतृत्वात नागपुरातील सिताबर्डी पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली. फडणवीस यांचे नागपुरात व राज्यात मोठ्या प्रमाणात समर्थक आहे. ते राज्याचे उपमुख्यमंत्री असूनदेखील त्यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करून उद्धव ठाकरे यांनी सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ठाकरे यांनी वापरलेल्या अपमानास्पद व अभद्र भाषेमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांसोबतच सामान्य नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. समाजातील शांतता भंग करून अराजकता निर्माण करण्याचा ठाकरे यांचा हा प्रयत्न असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत अटक करण्यात यावी, अशी मागणी या तक्रारपत्राद्वारे करण्यात आली आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे