लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : आ. टेकचंद सावरकर यांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भाेयर यांच्या विरुद्ध पाेलिसात तक्रार दाखल केल्यानंतर काॅंग्रेस कार्यकर्ते आता आक्रमक झाले आहेत. काॅंग्रेस सेवादलाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि. २२) दुपारी कामठी (नवीन)चे ठाणेदार विजय मालचे यांना निवेदन देत आ. टेकचंद सावरकर यांच्या विराेधात गुन्हा नाेंदविण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे राजकीय वळण प्राप्त झाले आहे.
कामठी शहरातील आढावा बैठकीत आरक्षित आसनावरून उद्भवलेला वाद आ. सावरकर यांनी सुरेश भाेयर यांच्या विराेधात कामठी (जुनी) पाेलीस ठाण्यात तक्रार दिल्याने साेमवारी (दि. २१) पाेलिसात पाेहाेचला. सुरेश भाेयर यांच्या विराेधात कारवाई करण्याची मागणीही भाजप कार्यकर्त्यांनी ठाणेदार विजय मालचे यांच्याकडे केली हाेती.
दरम्यान, काॅंग्रेस सेवादलाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी ठाणेदार विजय मालचे यांना निवेदन देत आ. टेकचंद सावरकर यांच्या विराेधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आढावा बैठकीत आ. सावरकर हे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांना गैरशब्दात बाेलले. बैठकीत गाेंधळ निर्माण करून त्यांना अपमानित केले. ते विकास कामात अडथळा निर्माण करीत असल्याने त्यांच्याविराेधात गुन्हा नाेंदविण्यात यावा, असेही या निवेदनात नमूद केले आहे. शिष्टमंडळात प्रदेश सेवादल काँग्रेसचे महासचिव राजकुमार गेडाम, सोहेल अंजूम, अब्दुल सलाम अन्सारी, प्रदीप साखरकर, अन्वर हैदर, मंजू मेश्राम, मोहम्मद इरफान, तुषार बोबाटे, हरिहर पोटभरे, कन्हैया कुरील, फिरोज खान, आकाश भोकरे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचा समावेश हाेता.