- गुन्हे शाखेचे पीडितांना आवाहन
नागपूर : जय श्रीराम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये झालेल्या ८६ कोटी रुपयाच्या फसवणुकीतील पीडितांनी पोलिसात तक्रार दाखल करण्याचे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेने केले आहे.
सोयायटीने केलेल्या ८६ कोटी रुपयाच्या हेराफेरी प्रकरणात सोसायटीचा अध्यक्ष व सूत्रधार खेमचंद मेहरकुरे, त्याचा मुलगा अभिषेक मेहरकुरे, याेगेश चरडे, कुश कावरे, अशोक दुरगुडे, अर्चना टेके व सुनीता पोलला अटक केली आहे. सर्वांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी घोटाळा केला असून, या प्रकरणात अनेक बड्या असामी असल्याचे बोलले जाते. अत्यंत योजनाबद्धरीत्या मेहरकुरेच्या मदतीने ही हेराफेरी करण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी गुंतवणूकदारांनी पोलीस आयुक्तांची भेट घेत पडद्यामागील सूत्रधाराला अटक करण्याची मागणी केली होती. आर्थिक शाखेने पीडित नागरिकांना प्रशासकीय इमारत क्रमांक १, सिव्हिल लाईन्सस्थित कार्यालयात ०७१२-२५३४०१२ तसेच पीआय मीना जगताप यांच्याशी ९९२३४८२६४४ वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
----
युवकासह तिघांची आत्महत्या
नागपूर : शहरात एका युवकासह तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सिंधी कॉलनी, खामला निवासी ३९ वर्षीय धीरज गुलराजमल पंजवानी यांनी रविवारी दुपारी आपल्या घरात गळफास घेतला. न्यू शिवाजीनगर, गिट्टीखदान निवासी ३० वर्षीय अविनाश खाडे या मजुराने रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. तर बालाजीनगर, कळमना निवासी ५० वर्षीय अजय बोदेले यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.