लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजप नेते व माजी मंत्रू चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनक भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरुद्ध कोराडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वाढीव वीजबिल विरोधात शुक्रवारी भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. बावनकुळे यांच्या नेतृत्वात कोरोडी औष्णिक वीज केंद्राच्या गेटसमोर आंदोलन करण्यात आले.
पोलीस आयुक्तांनी नागपुरात मनाई आदेश लागू आहे, पोलिसांनी कार्यकर्त्यांना याची कल्पना दिली. त्यानंतरही भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आंदोलन केले. कोराडी, महादुला येथील वीज कार्यालयाला कुलुप लावले. वीज बिलाची होळी केली. पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले. या पार्श्वभूमीवर कोरोडी पोलिसांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह किशोर बरडे, राजेश रंगारी, नरेंद्र धानोळे, प्रितम लोहसारवा, दर्ष गहुकर, मोरेश्वर बिरखेडे यांच्यासह इतर भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध कलम १४३, १८८, २६९, २७० भादंवि सहकलम ५१ (ब) राष्ट्रीय आपत्ती कायदा २००५, कलम ३, साथरोग अधिनियम १८९७, सहकलम १३५ मपोका अन्वये गुन्हा दाखल केला आहे.