शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
4
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
5
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
6
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
7
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
8
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
9
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
10
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
11
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
12
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
13
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
14
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
15
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
16
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
17
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
18
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
19
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
20
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट

निवृत्त सहायक पोलीस आयुक्तांविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Published: October 17, 2015 3:34 AM

निवृत्त सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) शिवप्रसाद संतुरामजी कुदरे (वय ६०, रा. नरेंद्रनगर) यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईत मालमत्ता : अपसंपदेचा आरोप, एसीबीची कारवाईनागपूर : निवृत्त सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) शिवप्रसाद संतुरामजी कुदरे (वय ६०, रा. नरेंद्रनगर) यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. नोकरीत असताना पदाचा गैरवापर करून लाखोंची अपसंपदा जमविल्याच्या आरोपावरून एसीबीने ही कारवाई केली असून, पोलीस दलात खळबळ उडाली आहे.कुदरे शहर पोलीस दलात विविध पदावर कार्यरत होते. गुन्हेशाखेच्या आर्थिक सेलमध्ये कार्यरत असताना कळमना सोसायटीच्या घोटाळ्याचा अर्थात प्रमोद अग्रवाल याच्या फसवणूक प्रकरणाचा तपास कुदरे यांच्याकडेच होता. यानंतर कुदरे यांचे प्रमोशन होऊन ते एसीपी झाले. २०१३ मध्ये ते निवृत्त झाले. त्यांनी आपल्या नोकरीच्या काळात पदाचा दुरुपयोग करून प्रचंड अपसंपदा जमविल्याचा आरोप होता. त्याबाबत एसीबीकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्या होत्या. त्यामुळे एसीबीचे अधीक्षक राजीव जैन यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक मिलिंद तोतरे तसेच धर्मेद्र काळे, कोमल बिसेन, मनोज कारणकर, राजेंद्र जाधव आणि मनोहर डोईफोडे यांनी कुदरेची उघड चौकशी सुरू केली. कुदरे यांचे वसई मुंबईत दोन फ्लॅट, नागपुरात एक, एक झायलो गाडी आणि अन्य मालमत्ता एसीबीच्या चौकशीत उजेडात आली. कुदरे २२ जानेवारी १९७६ ला पोलीस दलात रुजू झाले. तेव्हापासून तो निवृत्तीच्या ३१ मार्च २०१३ पर्यंत त्यांनी ज्ञात स्रोताव्यतिरिक्त जास्त मालमत्ता जमविल्याचे स्पष्ट झाल्यामुळे या मालमत्तेबाबत कुदरे यांच्याकडे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी विचारणा केली. ते याबाबत समाधानकारक माहिती देऊ शकले नाहीत. (प्रतिनिधी)गुन्हा दाखल कुदरे यांनी १० लाख, १० हजार, ९५१ रुपयांची अपसंपदा जमविल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले. त्यामुळे एसीबीने शुक्रवारी कुदरे यांच्याविरोधात अजनी पोलीस ठाण्यात अपसंपदेचा गुन्हा दाखल केला.