पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया : ‘कॅप’च्या पहिल्या फेरीअखेर ५६ टक्के जागा रिक्तनागपूर : अभियांत्रिकी शाखेप्रमाणेच पॉलिटेक्निक प्रवेशाची स्थितीदेखील खालावलेली दिसून येत आहे. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत ‘कॅप’च्या (सेंट्रलाईज्ड अॅडमिशन प्रोसेस) पहिल्या फेरीअखेर केवळ ४४ टक्के जागा भरल्या गेल्या आहेत. अजून दोन फेऱ्या शिल्लक असून ‘कॅप’अंतर्गत येणाऱ्या १२,९४६ जागा कशा भरतील, ही चिंता महाविद्यालयांसमोर उभी ठाकली आहे. विभागातील सर्व ७१ ‘पॉलिटेक्निक’ महाविद्यालये मिळून एकूण २५,३६४ जागा उपलब्ध आहेत. तंत्रशिक्षण संचालनालयाकडून राबविण्यात येणाऱ्या प्रवेशासाठी यंदा ६८ टक्केच अर्ज दाखल करण्यात आले होते. २३,२४४ जागा या ‘कॅप’अंतर्गत येतात. ‘कॅप’च्या पहिल्या फेरीअखेर यापैकी १०,२९८ प्रवेशच झाले आहेत. म्हणजेच १२,९४६ जागा (५६ टक्के) रिक्त आहेत. जर एकूण उपलब्ध जागांच्या तुलनेत आकडेवारी काढली तर २५,३६४ पैकी १५,०६६ म्हणजेच सुमारे ५९ टक्के जागा रिक्त आहेत.(प्रतिनिधी)
रिकाम्या जागा (कशा) भरा?
By admin | Published: August 03, 2014 12:58 AM