लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शेतकरी व पशुधन विकासाकरिता स्थापन महाराष्ट्र पशुधन विकास मंडळातील १९ पैकी १० पदे रिक्त असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते विवेक टाले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने बुधवारी पशुसंवर्धन विभागाचे सचिव, मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पशुसंवर्धन आयुक्त यांना नोटीस बजावून यावर तीन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला.याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. मंडळात सहायक आयुक्त (पशुसंवर्धन), स्वीय सहायक, सांख्यिकी अन्वेषक, वरिष्ठ सहायक, कनिष्ठ लिपिक व वाहन चालक यांचे एकेक तर, वरिष्ठ लिपिक व शिपाई यांचे प्रत्येकी दोन पदे रिक्त आहेत. त्यामुळे मंडळाचे कामकाज रामभरोसे सुरू आहे. शेतकरी कल्याणावर याचा गंभीर परिणाम होत आहे. हे मंडळ २००२ मध्ये स्थापन झाले असून शेतकऱ्यांना जोडधंद्यांचे प्रशिक्षण देणे, दुधाचे उत्पादन वाढवणे, अधिक उपयोगी पशुधन विकसित करणे हे मंडळाचे काही प्रमुख उद्देश आहेत, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. अश्विन इंगोले यांनी बाजू मांडली.
महाराष्ट्र पशुधन विकास मंडळातील रिक्त पदे भरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 8:32 PM
शेतकरी व पशुधन विकासाकरिता स्थापन महाराष्ट्र पशुधन विकास मंडळातील १९ पैकी १० पदे रिक्त असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते विवेक टाले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने बुधवारी पशुसंवर्धन विभागाचे सचिव, मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पशुसंवर्धन आयुक्त यांना नोटीस बजावून यावर तीन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला.
ठळक मुद्देहायकोर्टात याचिका : राज्य सरकारला मागितले उत्तर