ठळक मुद्देप्रकृती स्थिर
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांना नागपूरच्या अवंती इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कामानिमित्त काल ते नागपुरात आले होते. रात्री त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना धंतोलीतील डॉक्टर माहुरकर यांच्या अवंती इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे.नागपुरात येत्या ७ ते १० फेब्रुवारीदरम्यान होऊ घातलेल्या तिसऱ्या ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने देण्यात येणारा ऑरेंज सिटी कल्चरल फाऊंडेशन पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता. यानिमित्ताने त्यांचे नागपुरात आगमन झाले होते. या कार्यक्रमात त्यांची मुलाखतही घेण्यात आली होती.