शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

अखेर भाजपाच्या संदीप गवईंची स्वप्नपूर्ती, चुरशीच्या लढतीत काँग्रेसवर मात 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 8:45 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदार संघातील प्रभाग ३५ च्या ‘अ’ (अनूसूचित जाती) मध्ये झालेली पोटनिवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची होती. विजयासाठी भाजपाच्या पदाधिका-यांनी शक्ती पणाला लावली.

नागपूर :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदार संघातील प्रभाग ३५ च्या ‘अ’ (अनूसूचित जाती) मध्ये झालेली पोटनिवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची होती. विजयासाठी भाजपाच्या पदाधिका-यांनी शक्ती पणाला लावली. मात्र, मतदानाची टक्केवारी घटल्याने भाजपाची धाकधुक वाढली होती. अखेर काट्याच्या लढतीत भाजपाचे उमेदवार संदीप गवई विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार पंकज भोरात यांचा ४६३ मतांंनी पराभव केला. गवई यांना ५७११ मते मिळाली तर थोरात यांना ५२४८ मते मिळाली. गुरुवारी सकाळी १० वाजता सीताबडीं येथील  बचतभवन येथे मतमोजणी झाली.  मतमोजणीच्या अखेरच्या फेरीपर्यत काँग्रेसने चांगली टक्कर दिली. अखेर गवई विजयी झाल्याचे घोषित होताच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. भाजपाचे नगरसेवक नीलेश कुंभारे यांच्या निधनामुळे  जागा रिक्त झाल्याने जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली.  आठ उमेदवार मैदानात होते. भाजपाचाच उमेदवार विजयी होईल. असा दावा पक्षाच्या नेत्यांनी केला होता. दोन आठवड्यापासून या प्रभागात  जोरदार प्रचार मोहीम राबविली. तब्बल १२० कॉर्नर बैठका घेतल्या. मात्र २४.३३ टक्केच मतदान झाल्याने धाकधूक वाढली होती. काँँग्रेसकडूनही विजयाचा दावा केला जात असल्याने निवडणूक  निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.  प्रभागातील  ५७,६९३ मतदारांपैकी १४,०३५ मतदरांनी मतदानाचा हक्क बजावला . यापैकी गवई यांना ५७११ तर थोरात यांना ५२४८ मते मिळाली. बसपाच्या नंदा झोडापे यांना १६७५, अपक्ष गौतम कांबळे  यांना ६६८, आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियातर्फे सहदेव नारनवरे यांना १३०, अपक्ष  मनोज इंगळे  १४ ,वंदना जीवने ४२६,  तर  सुनील कवाडे यांना १५ मते मिळाली. १४७ मतदारांनी नोटाचा वापर केला. 

पाचव्या व सहाव्या फेरीने वाढविला गवईंचा बीपी मतमोजणीच्या पहिल्या चार फेरीत गवई यांनी थोरात यांच्यावर ७७७ मतांची आघाडी घेतली होती. मात्र पाचव्या व सहाव्या फेरीत थोरात यांना १४४६ तर गवई यांना ८८६ मते मिळाली. गवई यांचे मताधिक्य २१७ मतांवर आल्याने निकालाची उत्सुकता वाढली होती. सातव्या फेरीत पुन्हा गवर्इंनी थोरात यांच्यापेक्षा ५४ मते अधिक मिळाली. अखेरच्या फेरीत गवई यांना अधिक मते घेत विजय सुनिचित केला.

टॅग्स :Electionनिवडणूक