नागपूर : मागील पाऊणे दोन महिन्यापासून नागपुरातील नाग नदीच्या पात्रात दिसत असलेलेल्या मगरीला पकडण्यात अखेर वन विभागाला यश आले आहे.
शनिवारी १ जानेवारीला सायंकाळी या मगरीला पकडण्यासाठी कोल्हापूर करून वन विभागाचे विशेष पथक आले होते. या पथकाने लावलेल्या दोन पिंजऱ्यामध्ये कोंबडी ठेवली होती. ती कोंबडी खाण्यासाठी मगर नेमकी पिंजऱ्यात आली आणि रात्रीच अलगदपणे जाळ्यात अडकली.
आज सकाळी तिला पकडून सेमिनरी हिल्स वरील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणी आणि कायदेशीर सोपस्कारानंतर तिला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले जाणार असल्याची माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.