लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आॅटोचालकांसाठी सुरक्षा कवच असलेले कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याच्या निर्णयाला घेऊन मंगळवारी आॅटोचालकांनी जल्लोष साजरा केला. गेल्या तीन वर्षांपासून आॅटोचालकांची ही मुख्य मागणी प्रलंबित होती. विदर्भ आॅटोरिक्षा चालक फेडरेशनच्यावतीने शुक्रवारी आॅटोचालक आनंदोत्सव रॅली काढणार आहे.आॅटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने १४ डिसेंबर २०१७ रोजी महामोर्चाचे आयोजन करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. या समितीचे कार्याध्यक्ष विलास भालेकर यांनी सांगितले, कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीला घेऊन गेल्या तीन वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. आता याला मंजुरी मिळाल्याने आॅटोरिक्षाचालकांना मोठा फायदा मिळेल. यात सरकारला एक रुपयाही खर्च न करता महामंडळाद्वारे आॅटोरिक्षा चालकांना पेन्शन, कुटुंबीयांचे आरोग्य, शिक्षण आदी सर्व सोयीसुविधा मिळू शकतील, असेही ते म्हणाले. सरकारच्या या निर्णयाला घेऊन विदर्भ आॅटोरिक्षा चालक फेडरेशनने आॅटोरिक्षाचालकांची बैठक घेऊन त्यात जल्लोष करण्यात आला. यावेळी आॅटोरिक्षा चालक महामंडळाची स्थापना परिवहन विभागांतर्गत व्हावी व प्रत्येक जिल्हा समितीवर फेडरेशनचा प्रतिनिधी असावा, हा ठराव घेण्यात आला. बैठकीला टायगर आॅटोरिक्षा संघटनेचे अध्यक्ष जावेद शेख यांच्यासह विदर्भातील पदाधिकारी उपस्थित होते. संचालन फेडरेशनचे महासचिव आनंद चौरे यांनी केले तर आभार देवा निखाडे यांनी मानले.
अखेर कल्याणकारी महामंडळाची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 10:59 PM
आॅटोचालकांसाठी सुरक्षा कवच असलेले कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याच्या निर्णयाला घेऊन मंगळवारी आॅटोचालकांनी जल्लोष साजरा केला. गेल्या तीन वर्षांपासून आॅटोचालकांची ही मुख्य मागणी प्रलंबित होती. विदर्भ आॅटोरिक्षा चालक फेडरेशनच्यावतीने शुक्रवारी आॅटोचालक आनंदोत्सव रॅली काढणार आहे.
ठळक मुद्देआॅटोचालकांमध्ये जल्लोष : विदर्भ आॅटोरिक्षा चालक फेडरेशनकडून शुक्रवारी विजय रॅली