लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: विशाखापट्टनमहून निघालेली ऑक्सिजन एक्सप्रेस शुक्रवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास नागपूर रेल्वेस्थानकावर दाखल झाली. या एक्सप्रेसमधून ऑक्सिजनचे तीन टँकर नागपुरात उतरविण्यात आले. या तीन टँकरपैकी एक टँकर ट्रक्सवर चढवून तो ग्रीन कॉरीडॉर पद्धतीने अमरावतीला नेण्यात येणार आहे.रेल्वेद्वारे ऑन रोल पद्धतीने ऑक्सिजन पोहचवला जातो आहे. काल विशाखापट्टनमहून निघालेली ही रेल्वे नागपूर रेल्वेस्थानकावरील फलाट क्र. ८ वर संध्याकाळी पोहचली. यातील तीन टँकर्स नागपुरात उतरविण्यात आले. नागपुरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता व ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेता हे तीन टँकर्स येथे उतरवण्यात आले आहेत.१८ एप्रिल रोजी ही रेल्वे कलंबोळी येथून निघाली होती. विशाखापट्टनम येथील स्टील प्लान्टमधून ऑक्सिजन भरून ती नागपूर व नाशिकसाठी निघाली होती.
अखेर ऑक्सिजन एक्सप्रेस नागपुरात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 8:49 PM