लाेकमत न्यूज नेटवर्क
रेवराल : माैदा तालुक्यातील धानला-काेदामेंढी राेडवर धानला (ता. माैदा) येथील इंदिरानगरजवळ माेठा खड्डा तयार झाला हाेता. जीवघेणा ठरत असलेला ताे खड्डा सार्वजनिक बांधकाम विभागाने गुरुवारी (दि. २७) सिमेंट काँक्रिट टाकून बुजवला आहे.
हा मार्ग वर्दळीचा आहे. त्यावर तयार झालेल्या खड्ड्यांमुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. या राेडवरील खड्ड्यांमध्ये धानला येथील इंदिरानगरजवळील खड्डा सर्वात माेठा व धाेकादायक हाेता. धानला हे गाव विद्यमान आमदार, जिल्हा परिषद सभापती व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांचे मूळ गाव असूनही हा खड्डा बुजविण्यासाठी कुणीही तीन महिन्यापासून पुढाकार घेतला नाही. मध्यंतरी हा खड्डा बुजविण्यात आला हाेता. मात्र, सुमार कामामुळे ताे आठवडाभरात जैसे थे झाला. त्यामुळे लाेकमतमध्ये गुरुवारी (दि. २७) ‘धानला-काेदामेंढी राेडची दुरुस्ती करणार कधी?’ या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले.
या वृत्तात धानला येथील खड्ड्यासह राेडवरील इतर खड्डे व त्यामुळे झालेल्या व हाेत असलेल्या अपघातांचाही उल्लेख करण्यात आला हाेता. या वृत्ताची लगेच दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने कामगार पाठवून त्या खड्ड्यात सिमेंट काँक्रिट भरले व ताे तातडीने बुजविला. विशेष म्हणजे, यावेळी बांधकाम विभागाचे अभियंता खाेब्रागडे हजर हाेते. हा संपूर्ण मार्ग खड्डेमय झाला आहे. पावसाळ्यात त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचणार असल्याने राेडला डबक्याचे स्वरूप प्राप्त हाेईल. ते खड्डे अपघतांना निमंत्रण देत असल्याने इतर खड्डेही बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी बुजवावेत, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.