उमरेड : उमरेड तालुक्यातील बेला प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारपासून कोविड लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी ३२ ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी करीत लस घेतली. ‘लोकमत’ने शुक्रवारच्या अंकात ‘कोविड लसीकरणासाठी ४५ कि.मी. दूर जायचे कसे?’ या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित करीत बेला येथील ज्येष्ठ नागरिकांची समस्या मांडली होती. पहिल्याच दिवशी बेला परिसरातील ज्येष्ठांमध्ये लसीकरणासाठी उत्साह दिसून आला. लसीकरणाची गावातच सुविधा झाल्यामुळे सर्वांसाठी सोयीचे झाले, अशा प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. अनेकांनी समाधान व्यक्त केले. बेला प्राथमिक केंद्रातील आरोग्य अधिकारी डॉ. विकास ढोक, डॉ. स्वप्निल दडमल, डॉ. मीनाक्षी वाघमारे, गजानन मगर, कांचन चंदनखेडे, संगीता भुसारी, सपना पानसोक, हिरालाल घुटके, प्रशांत मेंढे, प्रगती गजभिये, शीतल निमजे, गणेश अवधूत, मंगला मोहर्ले, संदीप भगत आदींनी आरोग्य सेवा प्रदान करीत सहकार्य केले. सिर्सी, मकरधोकडा आणि पाचगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावरसुद्धा लसीकरण सुरू करण्यात आल्याची माहिती आहे.
अखेर बेला येथे कोविड लसीकरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 4:09 AM