नागपूर :जिल्हा परिषदेच्या विकास कामांवरील स्थगिती हटविल्यानंतर जिल्हा नियोजन समितीकडून जन व नागरी सुविधांचा असा एकूण ४७ कोटीवरील निधी प्राप्त झाला होता. मात्र हा निधी कोषागारात अडकला होता. भाजप नेत्यांनी हा निधी रोखल्याचा जि.प.तील सत्ताधाऱ्यांनी आरोप केला होता. आता हा निधी प्राप्त झाल्याने ग्रामीण भागातील रखडलेली कामे मार्गी लागण्याची आशा आहे.
जि.प.ला प्राप्त झालेला निधी पंचायत समिती स्तरावर वळता करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यामुळे ग्रामीण भागातील रखडलेल्या विकास कामांना सुरुवात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र पावसाला सुरुवात होण्यापूर्वी प्रस्तावित विकास कामे पूर्ण करावी लागतील. हाच निधी मे महिन्यात मिळाला असता तर पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण झाली असती. अशी माहिती जि.प.सदस्यांनी दिली.
पाच हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या गावात नागरी सुविधांच्या निधीतूनही कामे केली जातात. तर जनसुविधांच्या निधीतून ग्रामीण भागातील रस्ते, नाल्या, गटारे, स्मशानभूमी अशी आवश्यक कामे केली जातात. वर्ष २०२२-२३ या वर्षासाठी डीपीसीने जन-नागरी सुविधांच्या कामासाठी सुमारे पन्नास कोटीवरील निधी जि.प.ला दिला आहे. पावसाळ्यापूर्वी रस्ते, नाल्या, गटारे, स्मशानभूमींची कामे होणे गरजेचे आहे. जि.प.ला २०२१-२२ मधील जन सुविधेची ३१ कोटी ४४ लाख ७२ हजार रुपये आणि २०२२-२३ वर्षातील नागरी सुविधेचा १६ कोटींचा निधी असा एकूण ४७ कोटींवरील निधी जि.प.ला प्राप्त झाला होता. जन सुविधाच्या ३१ कोटीतून जिल्ह्याच्या तेराही तालुक्यात ३७९ कामे मंजूर आहेत.
तालुकानिहाय प्रस्तावित कामे व प्राप्त निधी (कोटी)
रामटेक - ३५ - २.८५कामठी - २८ - २.४९नरखेड - २१ - १.६५काटोल - २५ - २.५०उमरेड - २८ - २.५१कुही - २८ - २.२३हिंगणा - २८ - २.४०पारशिवणी - ३७ - २.५६नागपूर - ३६ - २.८४कळमेश्वर - १८ - १.६०सावनेर - ४० - ३.६५मौदा - ३७ - २.९६भिवापूर - १९ - १.२०