नरखेड : जिल्हा मध्यवर्ती बॅंक नरखेड शाखेच्या वतीने विविध सहकारी संस्थेच्या कार्यालयात बॅंक ग्राहक, शेतकरी, उद्याेजक, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी यांच्याकरिता ‘आर्थिक आणि डिजिटल साक्षरता’ शिबिर नुकतेच पार पडले. बॅंकेचे माजी संचालक सुरेश आरघाेडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष रामराव झाडे, सुनील कडमधाड, राजेंद्र घाडगे यांची उपस्थिती हाेती. शिबिरात बॅंक निरीक्षक दिगांबर घाेरपडे यांनी कर्जाचे नियाेजन, आर्थिक नियाेजन, बचत व गुंतवणुकीचे महत्त्व, किसान क्रेडिट याेजना, शासनाची सामाजिक सुरक्षा याेजना, पीकविमा याेजनेचे महत्त्व व त्याचे लाभ, पीककर्जावरील परत मिळणारे व्याज, डिजिटल बॅंकिंग व्यवहार करताना हाेणारी फसवणूक व बचावाचे उपाय आदींवर मार्गदर्शन केले. संचालन राजेसाहेब वाळवटे यांनी केले, तर शाखा व्यवस्थापक पुरुषाेत्तम येनाेरकर यांनी आभार मानले.
आर्थिक व डिजिटल साक्षरता शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2021 4:07 AM