शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

अत्याचार बळींसाठी १ कोटी २१ लाखांवर अर्थसाहाय्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2020 12:09 AM

नागपूर समाजकल्याण विभागाला अत्याचार बळींना भरपाई वितरित करण्यासाठी चालू आर्थिक वर्षातील डिसेंबरपर्यंत १ कोटी २१ लाख ६२ हजार रुपये अर्थसाहाय्य मिळाले आहे.

ठळक मुद्देकेंद्र व राज्याचे योगदान : १ कोटी १९ लाखांवर भरपाई वितरित

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नागपूर समाजकल्याण विभागाला अत्याचार बळींना भरपाई वितरित करण्यासाठी चालू आर्थिक वर्षातील डिसेंबरपर्यंत १ कोटी २१ लाख ६२ हजार रुपये अर्थसाहाय्य मिळाले आहे. त्यात केंद्र व राज्य सरकारचे प्रत्येकी ६० लाख ८१ हजार रुपयांचे योगदान आहे. अत्याचार बळींना त्यातून १ कोटी १९ लाख १० हजार रुपयाची भरपाई वितरित करण्यात आली आहे.समाजकल्याण विभागाने माहितीच्या अधिकारांतर्गत ही आकडेवारी दिली. विभागाला या योजनेसाठी २०१८-१९ या आर्थिक वर्षात १ कोटी ४७ लाख ८२ हजार रुपये अर्थसाहाय्य मिळाले होते. त्यातील १ कोटी २२ लाख ९० हजार रुपये वितरित करण्यात आले होते. वर्षाच्या शेवटी २४ लाख ९२ हजार रुपये शिल्लक होते. २०१७-१८ या आर्थिक वर्षात १ कोटी ४९ लाख ७० हजार रुपये मिळाले होते. त्यातील १ कोटी ४८ लाख १२ हजार रुपये वितरित करण्यात आले तर, १ लाख ५८ हजार रुपये शिल्लक होते. या योगदानात केंद्र व राज्य सरकारचा समान वाटा आहे. यासंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी अर्ज दाखल केला होता.२०१९-२० मधील अन्य अर्थसाहाय्य (डिसेंबरपर्यंत) : भारत सरकार मॅट्रिकोत्तर अनुसूचित जाती शिष्यवृत्ती - १० कोटी २ लाख २ हजार रुपये, सैनिक शाळा परिरक्षण भत्ता (अनुसूचित जाती) - ४ लाख ६० हजार रुपये, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार - ८ लाख रुपये, दलित वस्ती सुधार योजना - ३ कोटी ४९ लाख १५ हजार रुपये, मिनी ट्रॅक्टर योजना - १ कोटी २९ लाख ५० हजार रुपये, मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती राज्य सरकार - २ कोटी २५ लाख रुपये, शिक्षण व परीक्षा शुल्क - ७५ लाख रुपये, सैनिकी शाळा परिरक्षण भत्ता - ३८ हजार रुपये, वृद्धाश्रम अनुदान योजना - ३ लाख ६८ हजार रुपये, सामाजिक विकास योजना - ३ कोटी ६८ लाख रुपये, अनुसूचित जाती वस्त्या व कृषी पंपांना वीजजोडणी योजना - ५ कोटी ६० लाख ९१ हजार रुपये.

टॅग्स :Right to Information actमाहिती अधिकारRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता