शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

नागपूर मनपावर ग्रीनबसचा आर्थिक भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:50 AM

महापालिकेच्या परिवहन विभागातर्फे मे. स्कॅनिया व्हीकल प्रा. लि. कं पनीला इथेनॉलवर धावणाऱ्या ५५ ग्रीन बसेस चालविण्याची मंजुरी देण्यात आली आहे. सध्या शहरातील रस्त्यांवर २५ ग्रीन बसेस धावत आहेत. बस आॅपरेटरला प्रतिबस प्रति किलोमीटर ८५ रुपये दराने मोबदला द्यावा लागतो. तसेच भविष्यात यात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र ग्रीन बसचे भाडे अधिक असल्याने प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद नाही, यामुळे बससेवा तोट्यात चालवावी लागत आहे. भविष्यात ५५ बसेस चालविल्यास तोटा आणखी वाढण्याची शक्यता असल्याने परिवहन विभागाची चिंता वाढली आहे.

ठळक मुद्देबसेस वाढल्यास तोटाही वाढणार : परिवहन विभागाची चिंता वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या परिवहन विभागातर्फे मे. स्कॅनिया व्हीकल प्रा. लि. कं पनीला इथेनॉलवर धावणाऱ्या ५५ ग्रीन बसेस चालविण्याची मंजुरी देण्यात आली आहे. सध्या शहरातील रस्त्यांवर २५ ग्रीन बसेस धावत आहेत. बस आॅपरेटरला प्रतिबस प्रति किलोमीटर ८५ रुपये दराने मोबदला द्यावा लागतो. तसेच भविष्यात यात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र ग्रीन बसचे भाडे अधिक असल्याने प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद नाही, यामुळे बससेवा तोट्यात चालवावी लागत आहे. भविष्यात ५५ बसेस चालविल्यास तोटा आणखी वाढण्याची शक्यता असल्याने परिवहन विभागाची चिंता वाढली आहे.फेब्रुवारी २०१७ पासून जानेवारी २०१८ पर्यंत ग्रीनबस पासून महापालिकेला ७३ लाख ९९ हजार ८८७ रुपयाचा महसूल मिळाला. बस आॅपरेटरला १ कोटी २१ लाख ६ हजार ४४८ रुपये मोबदला म्हणून द्यावा लागला. म्हणजेच महापालिकेला ४७ लाख ६ हजार ५६१ रुपयांचा तोटा झाला. पुन्हा नवीन २५ ग्रीनबसची यात भर पडल्यास हा तोटा दुप्पट होण्याची शक्यता आहे. सध्या या बसेस हिंगणा, डिफेन्स,कन्हान, बुटीबोरी, मिहान, बेसा, पिंपळफाटा, बहादुराफाटा आदी मार्गावर धावतात. या बसचे भाडे प्रति २ किलोमीटरला १४ रुपये आकारले जाते. रेडबसच्या तुलनेत ग्रीन बसचे भाडे अधिक असल्याने ग्रीनबस रिकाम्या धावतात. यामुळे ग्रीन बस भाड्यात कपात करून प्रति २ किलोमीटरला १२ रुपये करण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाच्या विचाराधीन आहे.विद्यार्थ्यांना सवलत देण्याचा प्रस्तावग्रीन बसला प्रवासी मिळत नसल्याने शाळा - महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच उद्योगात काम करणाऱ्या कामगारांना बस भाड्यात सवलत देण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाच्या विचाराधीन आहे. याबसमध्ये प्रवासी भाड्यात सवलत दिल्यास ग्रीन बसला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBus Driverबसचालक