शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

नागपूर जिल्हा परिषदेवर आर्थिक संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 10:20 PM

नागपूर जिल्हा परिषदेवरही आर्थिक संकट निर्माण झाले आहे. निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकणार आहे. अशापरिस्थितीत आर्थिक संकट निर्माण झाल्याने, त्याचा फटका निवडणुकीतही बसण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देतिजोरीत ठणठणाट : लाभाच्या योजना राबविणे अवघड

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : जिल्हा परिषदेवरही आर्थिक संकट निर्माण झाले आहे. कारण जिल्हा परिषदेची तिजोरी रिकामी झाली आहे. एकीकडे लाभाच्या योजनांचा मोठा भार आहे. निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकणार आहे. अशापरिस्थितीत आर्थिक संकट निर्माण झाल्याने, त्याचा फटका निवडणुकीतही बसण्याची शक्यता आहे.जिल्हा परिषदेचा थेट संबंध ग्रामीण भागाशी येतो. जिल्हा परिषद सेसफंडाच्या माध्यमातून विद्यार्थी, महिला, शेतकरी, युवकांसाठी लाभाच्या योजना राबविते. दोन वर्षापासून लाभाच्या योजनांचा लाभ डीबीटीच्या माध्यमातून देण्यात येत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. त्यातच आता जे लाभार्थी डीबीटी असतानाही लाभ मिळवून घेत आहे, परंतु त्यांच्या खात्यात पैसे जमा करायला जि.प.कडे पैसे नाही, त्यामुळे ग्रामीण भागात नाराजीचा सूर उमटत आहे.जिल्हा परिषदमध्ये महिला बालकल्याण, कृषी, समाजकल्याण, शिक्षण व पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून लाभाच्या योजना राबविण्यात येतात. जि.प.च्या बजेटमधून त्यासाठी निधीची तरतूदही करण्यात येते. डीबीटीमुळे प्रथम लाभार्थ्याला आपल्या खिशातून पैसे लावून साहित्याची खरेदी करावी लागते. त्यानंतर वस्तूची पावती दिल्यावर लाभार्र्थ्यांच्या खात्यात पैसा वळता केला जातो. यासाठी संबंधित विभागाकडून निधी पंचायत समितीस्तरावर पाठविण्यात येते. पंचायत समितीमार्फतच निधी संबंधित लाभार्थ्याच्या खात्यात वळता होतो. आचारसंहिता लागणार असल्याने काही पंचायत समितींकडून लाभार्थ्यांची यादी अंतिम करण्यात आली आहे. संबंधित लाभार्थ्यांनी साहित्याचीही खरेदी केली. मात्र लाभार्थ्यांना डीबीटीचा पैसा मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहे. त्यासाठी मुख्यालयाच्या चकरा मराव्या लागत आहे. जिल्हा परिषदच्या तिजोरीत पैसा नसल्याने पंचायतस्तरावर निधीच वितरित झाला नाही. उत्पन्नावर परिणाम, शासनाचाही निधी नाहीजिल्हा परिषदेला कराच्या माध्यमातून उत्पन्न मिळते. परंतु ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे कर वसुलीवर परिणाम झाला आहे. शासनाकडून मिळणारा निधी अजूनही मिळालेला नाही. त्यामुळे तिजोरीत अवघे सात ते आठ लाख रुपयांची रक्कम शिल्लक असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. नोव्हेंबर महिन्यात निधी येण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूर