शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

नागपुरात  तपास यंत्रणेतील एएसआयविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 8:22 PM

सुरक्षा दलात काम करणाऱ्या एका तरुणीला नोकरी तसेच लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षांपासून तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या तपास यंत्रणेतील एका एएसआयविरुद्ध गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देदोन वर्षांत वारंवार शरीरसंबंध : तरुणीचा बलात्काराचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सुरक्षा दलात काम करणाऱ्या एका तरुणीला नोकरी तसेच लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षांपासून तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या तपास यंत्रणेतील एका एएसआयविरुद्ध गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.अमितकुमार शर्मा (वय ३६) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) मध्ये काम करतो. तो धनबाद, झारखंड येथील रहिवासी असून, सध्या दिल्लीत कार्यरत असल्याचे गणेशपेठ पोलीस सांगतात. तक्रार करणारी तरुणी (वय २६) मूळची सावनेरची आहे. ती राज्य सुरक्षा दल (एमएसएफ) काम करते. धनबाद येथे कार्यरत असताना तरुणीची तीन वर्षांपूर्वी शर्मा सोबत ओळख झाली. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. शर्माने तिला चांगल्या नोकरीसोबत लग्नाचेही आमिष दाखवले. त्यानंतर ते एकमेकांसोबत इकडे तिकडे जाऊ लागले. दोन वर्षांपूर्वी ती आपल्या गावी सावनेरला आली. ५ एप्रिल २०१६ ला नागपुरात आल्यानंतर ते दोघे सेंट्रल एव्हेन्यूवरील हॉटेल राजहंसमध्ये २०२ क्रमांकाच्या रूममध्ये थांबले. तरुणीने तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे शर्माने यावेळी तिला गुंगी येणारा पदार्थ खाऊ घातला आणि तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तो तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन शरीरसंबंध जोडू लागला. तो लग्न करणार असल्याची खात्री असल्याने तरुणी गप्प राहायची. ५ एप्रिल २०१६ ते १५ मे २०१८ या कालावधीत त्यांच्यात वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित झाले. त्यानंतर लग्नाचा विषय निघताच शर्मा तिला टाळू लागला. बदनामीची धमकी देऊ लागला. त्याने विश्वासघात केल्यामुळे तरुणीने गणेशपेठ पोलिसांकडे तक्रार नोंदवली.पोलिसांचा सावधगिरीने तपासप्रकरण संवेदनशील सुरक्षा यंत्रणेत (आयबी) कार्यरत असलेल्यांशी संबंधित असल्याने पोलिसांनी सखोल आणि सावधगिरीने चौकशी केली. त्यानंतर पीएसआय यू. एन. मडावी यांनी सोमवारी रात्री गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे. विशेष म्हणजे, गुप्तचर यंत्रणेत कार्यरत व्यक्तींचा सामान्य नागरिकांशी फारसा संबंध येत नाही. ते गोपनीय आणि ओळख लपवूनच काम करतात. शर्माने कशी काय ओळख जाहीर केली, ती बाब पोलीस अधिकाऱ्यांनाही धक्का देणारी ठरली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाRapeबलात्कार