लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागली. थोड्याच वेळात ती इतरत्र पसरली. आगीमुळे सर्वत्र धुराचे लोट उठल्याने परिसरातील नागरिकात घबराट निर्माण झाली. अग्निशमन विभागाच्या आठ गाड्यांनी आग रात्री ८ वाजताच्या सुमारास नियंत्रणात आली.परंतु धूर निघत असल्याने रात्री उशिरापर्यंत पाण्याचा मारा सुरूच ठेवला होता.डम्पिंग यार्ड परिसरातून हायटेन्शन लाईन गेली आहे. वाºयामुळे स्पार्किंग होऊन ठिणगी पडल्याने कचºयाने पेट घेतला. वाºयामुळे आग काही क्षणातच सर्वत्र पसरली. घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे उपायुक्त डॉ. प्रदीप दासरवार घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन विभागाच्या आठ गाड्या पोहोचल्या. परंतु आग व धुरामुळे आग विझविण्यात अडथळा येत होता. अग्निशमन विभागाच्या जवानांनी याही परिस्थितीत आगीवर नियंत्रण मिळवले. तसेच जेसीबीच्या साहाय्याने आग रोखण्यासाठी चर काढून कचरा वेगळा करण्यात आला. रात्री ८ वाजेपर्यंत आग आटोक्यात आली होती. परंतु कचºया खालून धूर निघत असल्याने पाण्याचा मारा सुरूच ठेवला होता. येथील कचºयाचे विड्रओज तयार करण्यात आले आहेत. या परिसरातच ही आग लागली दहा तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली, अशी माहिती प्रदीप दासरवार यांनी दिली.उन्हाळ्याच्या दिवसात भांडेवाडी येथे आग लागण्याचा धोका असतो. दरवर्षी उन्हाळ्यात आग लागण्याचे प्रकार घडतात गेल्या महिन्यातही भांडेवाडी येथे आग लागली होती.ती रात्री उशिरापर्यंत सुरू होती.भांडेवाडी परिसराला संरक्षण भिंत आहे परंतु सुरज नगरच्या बाजूने काही ठिकाणी भिंत नादुरुस्त असून या परिसरातील काही नागरिक भिंतीवरून डम्पिंग यार्डमध्ये जा. अनेकदा नागरिक शौचासाठी येतात बिडी, सिगारेटमुळे आग लागण्याच्या घटना घडतात. विंद्रोज मुळे गेल्या काही वर्षांत आग लागण्याच्या घटना बºयाच प्रमाणात कमी झालेल्या आहेत.
नागपुरातील भांडेवाडी डम्पिंग यार्डला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 9:46 PM