नागपूर : सोमवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात ठिकठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. एकाच दिवशी १३ ठिकाणी आगी लागल्या. यात प्रामुख्याने फटाक्यांच्या आतषबाजीमुळे आगी लागल्याची माहिती मनपाच्या अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
गणेश पेठ पोलीस स्टेशनसमोरील मंगल सरदा अपार्टमेंट येथे सोमवारी सायंकाळी ५.४० वाजण्याच्या सुमारास आग लागली. कॉटनमार्केट व गंजीपेठ येथील अग्निशमन केंद्राच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहचल्या व ही आग आटोक्यात आणली. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कळमना चिखली चौक पेट्राेलपंपासमोर काली माता मंदिरजवळ खाली प्लॉटवर आग लागण्याची दुसरी घटना घडली. कळमना स्टेशनच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली.
सोमवारी सायंकाळी ७.३०च्या सुमारास वर्धा रोडवरील लोकमत चौकाच्या बाजूच्या इमारतीच्या चौथ्या माळ्यावर आग लागली. कॉटन मार्केट व नरेंद्र नगर अग्निशमन केंद्राच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. रात्री ८.३०च्या सुमारास सिव्हील लाईन येथील नवीन वसाहतीसमोरील खोली क्रमांक १६० गाळ्याजवळ आग लागली. सिव्हील लाईन येथील अग्निशमन विभागाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली.
तात्या टोपे हॉलच्या मागील बाजूच्या घराला रात्री ९च्या सुमारास आग लागल्याची सूचना नरेंद्र नगर अग्निशमन केंद्राला मिळाली. त्यानुसार जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. जरीपटका भीम चौक येथील बाबा डेकोरेशनला आग लागण्याची घटना रात्री ९.२१ वाजण्याच्या सुमारास घडली. सुगत नगर केंद्राच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली.
दीनदयाळ नगर, आजी आजोबा पार्कमध्ये रात्री १० च्या सुमारास आग लागल्याची सूचना त्रिमूर्तीनगर स्टेशनला मिळाली. येथील जवानांनी ही आग आटोक्यात आणली.
शतावरी चौक रवी सावजी भोजनालयाच्या मीटरमध्ये आग लागल्याची घटना रात्री ११.१०च्या सुमारास घडली. नरेंद्रनगर अग्निशमन केंद्राच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली.
मनीषनगर कॉटन किंग शाळेजवळ झाडाला रात्री ११.३०च्या सुमालास आग लागली. नरेंद्रनगर केंद्राच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. गरीब नवाब चौक पतंजली दुकानाच्या समोर मेडिकल स्टोअरमध्ये रात्री ११.४५ च्या सुमारास फटाक्यांमुळे आग लागली. सक्करदरा केंद्राच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. गांधीसागर तलावाजवळ रात्री ११.३०च्या सुमारास आग लागली. गणेशपेठ केंद्राच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.
दांडेकर यांच्या घराला आग
खरबी रोडवरील शक्तीमातानगर येथील प्रशांत विठ्ठल दांडेकर यांच्या घराला देवघरातील दिव्यामुळे सायंकाळी ६च्या सुमारास लागलेल्या आगीत घरातील संगणक, सोफासेट, टेबल व अन्य साहित्य जळाल्याने ३५ हजारांचे नुकसान झाले. लकडगंज अग्निशमन केंद्राच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली.
मध्य रेल्वेच्या केबल गोदामाला आग
- अजनी परिसरातील रेल्वे क्वॉर्टरलगत असलेल्या मध्य रेल्वेच्या सिनिअर सेक्शन, इंजिनिअर, सिग्नल विभागाच्या केबल गोदामाला मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीत केबलचे मोठे नुकसान झाले. अग्निशमन विभागाच्या पाच गाड्यांनी तासभरात ही आग आटोक्यात आणली.
- केबल गोदामाला आग लागल्याने आगीचे लोळ दूरवरून दिसत होते. यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली होती. बघ्यांची गर्दी जमली होती. अग्निशमन विभागाच्या जवानांनी काही वेळात ही आग आटोक्यात आणल्याने मोठे नुकसान टळल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.