लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोरेवाडा वन क्षेत्रात गेल्या गुरुवारी आग लागल्यामुळे सुमारे एक हेक्टर परिसरातील वनसंपत्तीचे नुकसान झाले. आगीने भीषण रूप धारण केले नाही. पण थंडीच्या दिवसांत आग लागल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.आग कशामुळे लागली, याचे स्पष्टीकरण देण्यात आले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, युनिट-१ च्या प्रवेशद्वाराजवळ ही आग लागली होती. या प्रवेशद्वाराजवळ नागरी वस्ती आहे. तेथील नागरिक या ठिकाणी कचरा आणून टाकतात. परिसरात गवतही वाढलेले असते. त्यामुळे येथे नेहमीच आग लागण्याच्या घटना घडतात. गवत कापण्यासाठी यंत्र खरेदी करण्यात आले आहे. परंतु, गवत नियमित कापले जात नाही. गेल्या वर्षी युनिट-२ मध्ये आग लागल्यामुळे सुमारे दोन हेक्टर परिसर जळाला होता. त्यानंतर गेल्या ९ जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय प्राणी बचाव केंद्राजवळच्या परिसरात आग लागली होती. ती आग चार हेक्टर परिसरात पसरली होती. ११ जानेवारी रोजी १०० हेक्टर परिसर जळाला होता तसेच, २२ जानेवारी रोजी ४० हेक्टर परिसराचे आगीमुळे नुकसान झाले होते.नागरिकांशी समन्वयगोरेवाडा व्यवस्थापन वनक्षेत्राजवळ राहणाऱ्या नागरिकांसोबत समन्वय ठेवण्यासाठी विविध प्रयत्न करीत आहे. या नागरिकांचे सहकार्य मिळविण्यासाठी व त्यांना वनक्षेत्राप्रति जागृत करण्यासाठी गोरेवाडा व्यवस्थापनाने गेल्या वर्षी जंगल सफारी आयोजित केली होती. दरम्यान, नागरिकांना वनक्षेत्रात कचरा फेकण्यास मनाई करण्यात आली होती.फटाके कारणीभूतगोरेवाडा येथील आरएफओ पांडुरंग पखाले यांनी फटाक्यांमुळे आग लागली असण्याची शक्यता व्यक्त केली. वन कर्मचाऱ्यायांनी तत्काळ धावपळ करून आग विझविली. त्यामुळे वनक्षेत्राचे जास्त नुकसान झाले नाही, असेही त्यांनी सांगितले.मेडिकल स्टोअरसह तीन ठिकाणी आगीभंडारा रोडवरील एका मेडिकल स्टोअरसह तीन ठिकाणी सोमवारी रात्री आग लागली.भंडारा रोडवर मनोज बुनियानी यांचे मेडिकल स्टोअर आहे. तेथे रात्री १०.५० च्या सुमारास शॉर्ट सर्किट होऊन आग आली. त्यात दुकानातील फर्निचर, औषधे इत्यादी वस्तू जळून सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. मनपाचा अतिक्रमण विरोधी विभाग कारवाईतून जप्त केलेले साहित्य सीताबर्डी किल्ल्यातील पाणी टाकीजवळ गोळा करतो. त्या साहित्यांना आग लागली होती. अग्निशमन अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी पोहोचून आग विझवली. तिसरी घटना जरीपटका येथे घडली. येथील शिल्पा कापड दुकानात आग लागली होती. दुकानाच्या पहिल्या माळ्यावर कापड पॅकिंगसाठी खरड्याचे डबे ठेवले होते. रात्री ११ च्या सुमारास जळता फटाका पडल्यामुळे त्या डब्यांना आग लागली.