आॅनलाईन लोकमतनागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर दुपारी ४.३० वाजता प्लॅटफार्म क्रमांक ६/७ मध्ये इटारसी एण्डकडील भागात अचानक आगीचा भडका उडाला. आग लागल्याच्या दोन्ही बाजूला कोळशाने भरलेली मालगाडी उभी होती. सुदैवाने ही आग कोळसा असलेल्या मालगाडीपर्यंत पोहोचली नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.नागपूर रेल्वेस्थानकावर कचरा जाळण्याची कुणालाच परवानगी नाही. परंतु तरीसुद्धा मंगळवारी दुपारी ४.३० वाजता प्लॅटफार्म क्रमांक ६/७ च्या मध्ये कुणीतही कचरा पेटवून दिल्यामुळे आगीचा भडका उडाला. आगीच्या दोन्ही बाजूला कोळशाने भरलेल्या मालगाड्या उभ्या होत्या तर ओएचई तारेचे खांबही तेथे होते. तेथे मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले असल्यामुळे ही आग चांगलीच भडकली होती. सुदैवाने ही आग मालगाडीपर्यंत पोहोचली नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. काही वेळाने ही आग आपोआप आटोक्यात आली. एवढी मोठी आग लागूनही रेल्वेस्थानकावरील अधिकारी आणि सुरक्षा यंत्रणेला या आगीची माहिती नव्हती. या घटनेची रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेण्याची गरज आहे.