लाेकमत न्यूज नेटवर्क
काटाेल : अचानक आगीचा भडका उडाल्याने तीन घरे जळून खाक झाली. यात घरातील अन्नधान्य व साहित्याची राखरांगाेळी झाली. ही घटना काटाेल तालुक्यातील डाेरली (भिंगारे) येथे बुधवारी (दि.९) सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.
डाेरली (भिंगारे) येथील विठाबाई लक्ष्मण टुले, राधाबाई पुरुषाेत्तम टुले व नारायण नामदेव सराेदे यांच्या घरांना अचानक आग लागल्याचे दिसून आले. नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान, काटाेल व कळमेश्वर येथील अग्निशमन दलास पाचारण करून आग विझविण्यात यश आले. मात्र ताेपर्यंत तिन्ही घरातील घरगुती साहित्य व अन्नधान्य जळून खाक झाले. आगीच्या घटनेमुळे सदर तिन्ही कुटुंबीयांचे माेठे नुकसान झाले असून, तिन्ही कुटुंब उघड्यावर आले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक लाेकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. महसूल कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून तहसीलदारांना अहवाल पाठविला आहे. दरम्यान, डाेरलीचे सरपंच राकेश हेलाेंडे यांनी आगपीडित कुटुंबांना प्रत्येकी १० हजार रुपयाची मदत दिली. माजी जि.प. उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांच्या हस्ते आगपीडित कुटुंबांना मदतीचे धनादेश देण्यात आले. यावेळी पं.स. सभापती धम्मपाल खाेब्रागडे, माजी पं.स. सदस्य निशिकांत नागमाेते, नायब तहसीलदार रामकृष्णा जंगले, उपसरपंच प्रवीण धाेटे, अशाेक पांडे, ग्रामसेवक राहुल काठाेडे, तलाठी बी. डी. अंबाडारे, विजय झोडे, विष्णू सातपुते, रमेश जिवतोडे, रवी भिंगारे, बबलू बराडे, सतीश कापसे आदी उपस्थित होते. आगपीडित कुटुंबीयांना घरकूल व आर्थिक मदत देण्याचे आश्वासन पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.