शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
3
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
4
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
5
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
6
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
7
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
8
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
9
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
10
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
11
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
12
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
13
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
14
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
15
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
16
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
17
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
18
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
19
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
20
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का

रेल्वे प्लॅटफार्मच्या ड्रेनेज लाईनमध्ये आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 1:36 AM

रेल्वे स्टेशनच्या पूर्व द्वारावर प्लॅटफार्म क्रमांक ६ व ७ च्या मधे असलेल्या ड्रेनेज लाईनमधून मंगळवारी सकाळी अचानक आगीच्या ज्वाळा निघाल्याने स्टेशन परिसरात खळबळ उडाली.

ठळक मुद्देस्टेशन परिसरात धावपळ : ज्वलनशील द्रव्याबाबत माहिती नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे स्टेशनच्या पूर्व द्वारावर प्लॅटफार्म क्रमांक ६ व ७ च्या मधे असलेल्या ड्रेनेज लाईनमधून मंगळवारी सकाळी अचानक आगीच्या ज्वाळा निघाल्याने स्टेशन परिसरात खळबळ उडाली. ड्रेनेजमधून पेट्रोल आणि डिझेलसारखे ज्वलनशील द्रव्य वाहत असल्याचे आढळल्याने रेल्वे कर्मचाºयांची चांगलीच तारांबळ उडाली होती. अग्निशमन विभागाच्या मदतीने वेळेवर आग नियंत्रित केल्याने मोठी दुर्घटना टळली.मिळालेल्या माहितीनुसार सकाळी ९ च्या सुमारास प्लॅटफार्म ६ व ७ च्या मधे ड्रेनेज लाईनमधून आगीच्या ज्वाळा निघताना दिसल्या. यापासून थोड्याच अंतरावर दुचाकीचे पार्किंग स्टॅन्ड आहे. ही आग थोड्याच वेळात पूर्व गेटच्या बाहेर रस्त्याच्या पलीकडे संत्रा मार्केटला लागून असलेल्या नाल्यापर्यंत पोहचली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे चार बंब घटनास्थळावर पोहचले. ड्रेनेज लाईनच्या पाण्यावर पेट्रोल, डिझेलसारखे ज्वलनशील द्रव्य आढळून आल्याने कर्मचाºयांनी फोमच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन कर्मचाºयांच्या प्रयत्नामुळे काही वेळात आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. अग्निशमन विभागाची गाडी उशिरा रात्रीपर्यंत स्टेशन परिसरात ठेवण्यात आली.ड्रेनेज लाईनच्या पाण्यामध्ये पेट्रोलचा शिरकाव कुठून झाला ही बाब समजू शकली नाही. अग्निशमन अधिकारी ए.बी. गोडे यांच्यानुसार प्लॅटफार्म क्र. ६ व ७ अंतर्गत अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईनमध्ये दूषित पाण्यावर पेट्रोल तरंगताना आढळले. यामुळे ड्रेनेज लाईनच्या खालोखाल पेट्रोलची पाईपलाईन असल्याचा अंदाज लावण्यात येत आहे. मात्र ड्रेनेजमध्ये पेट्रोल मिश्रणाचे केंद्र समजू शकले नाही. यामुळे इंडियन आॅईलचे अधिकारी पराग डोंगरे, कमलेश कुमार आणि रेल्वे स्टेशनचे अधिकारी योगेश पाठक यांना तत्काळ बोलाविण्यात आले. यावेळी महापालिकेचे अग्निशमन अधिकारी उचके, दुधे आदी घटनास्थळावर पोहचले. प्लॅटफार्म क्रमांक १ पासून ८ पर्यंत तपासणी करण्यात आली. मात्र पेट्रोलचा गंध आला नाही.केवळ डिझेल फिलिंग सेंटरनागपूर रेल्वे स्टेशनवर गाड्यांच्या इंजिनसाठी केवळ डिझेल फिलिंग सेंटर असून तेही प्लॅटफार्मपासून बºयाच अंतरावर आहे. मात्र पेट्रोल फिलिंग सेंटर कुठेही नाही. असे असताना ड्रेनेज लाईनमध्ये पेट्रोलचा शिरकाव कुठून झाला, हा चौकशीचा विषय ठरला आहे.