शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

स्ट्राँग रुमसाठी अग्निशमनची यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 11:41 PM

नागपूर व रामटेक लोकसभा मतदार क्षेत्रासाठी ११ एप्रिलला मतदान झाले. मतदानानंतर दोन्ही लोकसभा क्षेत्रातील ईव्हीएम मशीन कळमना मार्केट येथील स्ट्राँग रुममध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत. दोन वेगवेगळ्या गोदामात या मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत. स्ट्राँग रुमच्या सुरक्षेसाठी पोलिसांच्या मदतीला सीआरपीएफची मदत घेण्यात आली आहे. तसेच नैसर्गिक आपत्ती वा आगीपासून वेळीच बचाव व्हावा, यासाठी अग्निशमन विभागाची मदत घेण्यात आली आहे.

ठळक मुद्देदोन फायर टेंडर २४ तास व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर व रामटेक लोकसभा मतदार क्षेत्रासाठी ११ एप्रिलला मतदान झाले. मतदानानंतर दोन्ही लोकसभा क्षेत्रातील ईव्हीएम मशीन कळमना मार्केट येथील स्ट्राँग रुममध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत. दोन वेगवेगळ्या गोदामात या मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत. स्ट्राँग रुमच्या सुरक्षेसाठी पोलिसांच्या मदतीला सीआरपीएफची मदत घेण्यात आली आहे. तसेच नैसर्गिक आपत्ती वा आगीपासून वेळीच बचाव व्हावा, यासाठी अग्निशमन विभागाची मदत घेण्यात आली आहे.कळमना येथील स्ट्राँग रुमच्या सुरक्षेसाठी गंजीपेठ व कॉटन मार्केट येथील अग्निशमन केंद्रांचे दोन फायर टेंडर २४ तास सज्ज ठेवण्यात आले आहे. दोन वाहनांसोबत एक उपअग्निशमन अधिकारी, प्रमुख अग्निशमन विमोचक, विमोचक, एक चालक, एक यंत्र चालक व दोन अग्निशामक विमोचक तीन पाळ्यात तैनात करण्यात आले आहेत. फायर टेंडरमध्ये पाण्यासोबतच आग नियंत्रणासाठी आवश्यक असलेली अन्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली आहे .आग नियंत्रणासाठी ४ किलो क्षमतेचे १० नग एबीसी स्टोर पे्रशर फायटर एस्टिंग्युशर लावण्यात आले आहे. तसेच अग्निशमन विभागाने जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना पत्र पाठवून स्ट्राँग रुम परिसरात अस्थायी स्वरूपात उभारण्यात आलेल्या तंबूचे कापड अग्निरोधक असावे, वीजतारा, अस्थायी वायरिंग, प्रकाशव्यवस्था शासन मान्यताप्राप्त कंत्राटदाराच्या माध्यमातून करावी, असे निर्देश दिले आहेत. संबंधित मंडप व वीज पुरवठ्याची व्यवस्था करण्यासाठी निवडणूक आयोगाने निर्देश देण्याची गरज आहे. २३ मे रोजी मतमोजणी होत असल्याने स्ट्राँग रुम परिसरात सुरक्षा व्यवस्था, आग व नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.जीपीएस यंत्रणा असलेल्या कंटेनरच्या माध्यमातून ईव्हीएम मशीन कळमना गोदामात आणण्यात आल्या. सीआरपीएफ जवानांच्या सुरक्षेत या मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत.स्ट्राँग रुम अंधारातनिवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दोन्ही लोकसभा मतदार क्षेत्रासाठी दोन वेगवेगळ्या स्ट्राँग रुम बनविण्यात आल्या आहे. यासाठी त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा ठेवण्यात आली आहे. जेथे ईव्हीएम आहेत, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वायरिंग नाही. वायरिंग नसल्याने अंधार आहे. त्यामुळे आग लागण्याचा धोका कमी होतो. सर्व बाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. मुख्य गोदाम सीआरपीएच्या सुरक्षेत आहे. दुसऱ्या घेऱ्याची जबाबदारी राज्य राखीव दलाकडे असून परिसरातील सुरक्षेची जबाबदारी कळमना पोलिसांकडे आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019