शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

नागपुरातील  अत्रे ले-आऊट येथील फायनान्स कंपनीला आग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 11:38 PM

अत्रे ले-आउट येथील फायनान्स कंपनीच्या कार्यालयाला मंगळवारी पहाटेच्या सुमारास आग लागली. यात कार्यालयातील फर्निचर, संगणक, दस्ताऐवज जळाल्याने लाखोंचे नुकसान झाले.

ठळक मुद्देधूर बाहेर काढण्याच्या प्रयत्नात केंद्र प्रमुखासह दोघे जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अत्रे ले-आउट येथील फायनान्स कंपनीच्या कार्यालयाला मंगळवारी पहाटेच्या सुमारास आग लागली. यात कार्यालयातील फर्निचर, संगणक, दस्ताऐवज जळाल्याने लाखोंचे नुकसान झाले.अत्रे ले-आऊट येथील पीतांबर नामक दोन मजली इमारतीच्या तळमजल्यावर एसडीबी फायनान्स सर्व्हिसेस कंपनीच्या नागपूर शाखेचे कार्यालय आहे तर इमारतीच्या वरच्या मजल्यावर निवासी फ्लॅट आहेत. नागरिकांना पहाटे ६.३० च्या सुमारास कंपनीच्या कार्यालयातून धूर निघत असल्याचे निदर्शनास आले. नागरिकांनी याची माहिती शाखा व्यवस्थापक सौरभ कोल्हटकर यांना दिली. त्यांची अग्निशमन विभागाला माहिती दिली.आगीमुळे इमारतीत सर्वत्र धूर पसरला होता. त्यामुळे आतील आग नियंत्रणात आणता येत नव्हती. घटनास्थळी पोहचलेल्या नरेंद्रनगर येथील अग्निशमन केंद्राचे प्रमुख धर्मपाल नाकोड व कर्मचारी दत्ता भोकरे यांनी कार्यालयाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करताच दराच्या काच तुटल्याने दोघाच्या हातावर जखमा झाल्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.जवानांनी आग आटोक्यात आणली. आगीत कार्यालयातील दोन प्रिंटर, तीन संगणक, तीन एसी, फर्निचर व कार्यालयीन दस्तावेज नष्ट झाले. आगीचे कारण मात्र कळू शकले नाही. सुदैवाने आग वेळीच आटोक्यात आली. अन्यथा वरच्या मजल्यापर्यंत आग पोहचली असती तर मोठा अनर्थ घडला असता.

टॅग्स :fireआगnagpurनागपूर