लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भंडारा मार्गावरील कापसी महालगाव परिसरात असलेल्या स्वरूची मसालेच्या पाच मजली कोल्ड स्टोअरेजला सोमवारी दुपारी १.५० च्या सुमारास आग लागली. कोल्डस्टोअरेजमध्ये हजारो टन मिरचीचा साठा आहे. आगीमुळे मिरचीचा धूर आजूबाजूच्या परिसरात पसरल्याने बचाव कामात अग्निशमन विभागाच्या जवानांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे दुपारी लागलेली आग रात्री उशिरापर्यंत आटोक्यात आलेली नव्हती.आगीची माहिती मिळाल्यानंतर थोड्याच वेळात अग्शिमन विभागच्या सात गाड्या घटनास्थळी पोहचल्या. यात सिव्हिललाईन मुख्यालय, कळमना, सक्करदरा व कॉटनमार्केट आदी ठिकाणच्या अग्निशमन केंद्रांच्या गाड्यांचा समावेश होता. कोल्ड स्टोअररेजला तीन दरवाजे आहेत. परंतु दोन दरवाजाच्या जागेत मिरचीचे पोते ठेवण्यात आले आहे. त्यामुळे एकाच दाराचा वापर शक्य असल्याने कोल्ड स्टोरजमधील आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाच्या जवानांना आतमध्ये जाता येत नाही. त्यामुळे एकाच दाराचा वापर करून व इमारतीच्या छतावरील मार्गाचा वापर करून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते. स्टोअरेजमध्ये मिरचीचा मोठा साठा आहे. आगीमुळे परिसरात सर्वत्र धूर पसरल्याने नागरिकांच्या डोळ्यांना त्रास होत आहे.कोल्ड स्टोअरेच्या ठिकाणी हायड्रन्ट यंत्रणा सुरू असल्याने आग नियंत्रणासाठी लागणारे पाणी उपलब्ध आहे. अग्निशमन विभागाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यासाठी यामुळे मदत झाली. लांबवरून पाणी आणावे लागत नसल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी दिली. पाणी उपलब्ध असल्याने अग्निशमन विभागाचे चार फायर टेंडर परत पाठविण्यात आले. कोल्ड स्टोअरेज सुभाषकुमार जैन यांच्या मालकीचे असून या कोल्डस्टोअरेजला यापूर्वीही आग लागली होती, अशी माहिती अग्निशमन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
नागपुरात पाच मजली कोल्डस्टोअरेजला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:46 AM
भंडारा मार्गावरील कापसी महालगाव परिसरात असलेल्या स्वरूची मसालेच्या पाच मजली कोल्ड स्टोअरेजला सोमवारी दुपारी १.५० च्या सुमारास आग लागली. कोल्डस्टोअरेजमध्ये हजारो टन मिरचीचा साठा आहे. आगीमुळे मिरचीचा धूर आजूबाजूच्या परिसरात पसरल्याने बचाव कामात अग्निशमन विभागाच्या जवानांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे दुपारी लागलेली आग रात्री उशिरापर्यंत आटोक्यात आलेली नव्हती.
ठळक मुद्देरात्री उशिरापर्यंत आग नियंत्रणाचे प्रयत्न: मिरचीच्या धुरामुळे बचावात अडचणी