लाेकमत न्यूज नेटवर्क
गुमगाव : वागदरा (नवीन गुमगाव) येथील किराणा दुकानाला आग लागल्याची घटना साेमवारी (दि. ९) मध्यरात्री घडली. यात दुकानातील साहित्य जळाल्याने दाेन लाख रुपयांचे नुकसान झाले, अशी माहिती दुकानदाराने दिली. शाॅर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंंदाज व्यक्त केला जात आहे.
देवानंद बारापात्रे (आर्वीकर), रा. वागदरा, ता. हिंगणा यांचे नवीन गुमगाव येथे किराणा दुकान आहे. साेमवारी मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास शेजाऱ्यांना त्या दुकानातून माेठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी दुकानदार देवानंद बारापात्रे यांना माहिती दिली. आत आग लागल्याचे स्पष्ट हाेताच नागरिकांनी मिळेल त्या साधनाने पाण्याचा मारा करीत आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
आग पूर्णपणे आटाेक्यात येईपर्यंत दुकानातील काही साहित्य जळून राख झाले. यात किमान दाेन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती देवानंद बारापात्रे यांनी दिली. ही आग शाॅर्टसर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत त्यांनी पाेलिसात तक्रार नाेंदविली. त्यामुळे जमादार सिद्धार्थ तामगाडगे व संजय तिवारी यांनी मंगळवारी सकाळी घटनास्थळाचा पंचनामा केला.